BJP On Uddhav Thackeray | “स्वाभिमान गमावणे याचा अर्थ बघायचा असेल तर उद्धव ठाकरे अन्… ” – भाजप
मुंबई: BJP On Uddhav Thackeray | आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) , विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्यात जागावाटपावरून चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान या भेटीवरून भाजपाने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “स्वाभिमान गमावणे याचा सोपा अर्थ बघायचा असेल तर लोकांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना उबाठा (Shivsena UBT) कडे बघावे” असे म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर एक पोस्ट करत केशव उपाध्ये (Keshav Upadhye) म्हणाले, ” स्वाभिमान गमावणे ह्याचा सोपा अर्थ बघायचा असेल, तर लोकांनी आजच्या उद्धव ठाकरे आणि शिवसेना उबाठा कडे बघावं. २५ वर्ष भारतीय जनता पक्षासोबत वैचारिक तत्वांवर आधारलेली युती, जी प्रत्यक्ष स्व. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन (Pramod Mahajan), गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांसारख्या महाराष्ट्राच्या धुरिणांनी काँग्रेसला सत्तेबाहेर करण्यासाठी अस्तित्वात आणली होती.
भाजपा सोबत लढताना १२५ पेक्षा जास्त जागांवर लढणारी शिवसेना, म्हणजे आताची उबाठा कशाबशा १०० जागा मिळवण्यासाठी कुटुंबासह दिल्लीचे उंबरे झिजवत आहे. दिल्लीपुढे आम्ही झुकत नाही, आमचा स्वाभिमान झुलवत नाही, आम्ही कोणाला विचारायला जात नाही, म्हणून डरकाळ्या फोडणारे ठाकरे आज दिल्लीत जाऊन दोन – चार जागांसाठी काँग्रेस नेत्यांच्या घरचे हेलपाटे घालत आहेत.”
ते पुढे म्हणाले, ” एकेकाळी ज्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या निवडणुका लढल्या जायच्या ते जागावाटप करण्याचे सूत्र ठरवायचे, तेच आज जागांचा जोगवा मागत फिरत आहे. ज्या अमित शहांची तुलना उद्धव ठाकरेंनी अब्दालीशी केली, तेच अमित शहा भाजपाचे अध्यक्ष असतानाही मातोश्री वर चर्चेसाठी आले व योग्य तो सन्मान दिला. पण वैचारिक भिकेचे डोहाळे लागलेल्या उद्धव ठाकरेंना ते पटले नाही.
ज्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी आणि सत्तेच्या हव्यासापोटी भाजप सोबतची युती तोडली, ती सत्ता तर गेलीच, पक्षही गेला. चुकून आणि दुर्दैवाने मिळालेलं मुख्यमंत्रीपद ही गेलं आणि आता ज्यांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्री पद स्वीकारले असे उध्दव ठाकरे सांगत होते, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजेच महाविकास आघाडी आज तुमचे नावही मुख्यमंत्रीपदासाठी घेत नाहीये” असा खोचक टोलाही उपाध्येंनी ठाकरेंना लगावला आहे.
Comments are closed.