नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील ( Utter Pradesh) भाजप ( BJP) खासदार रीता बहुगुणा जोशी ( Rita Bahuguna Joshi) यांच्या अवघ्या सहा वर्षांच्या नातीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दिवाळीच्या दिवशी फटाके वाजवत असताना भाजल्याने त्यांच्या नातीचा मृत्यू झाला आहे. रीता बहुगुणा जोशी या प्रयागराज मतदारसंघातून भाजपच्या खासदार आहेत. दिवाळीत फटाके फोडत असताना भाजल्यानंतर तिला लगेचच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सकाळीच तिला उपचारासाठी दिल्लीला हलवण्यात आलं होतं. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.
भाजप खासदार रीता बहुगुणा जोशी यांचा मुलगा मयंक जोशी ( Mayank Joshi) यांची सहा वर्षांची मुलगी फटाके फोडत होती. यावेळी तिच्या कपड्याने पेट घेतला. त्यामुळे ती गंभीर भाजली. यानंतर तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी चिमुकलीचं शरीर 60 टक्के भाजल्याचं सांगितलं. तसेच तिला उपचारांसाठी दिल्लीला हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर एअर अॅम्बुलन्सच्या मदतीने तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात ( Aims Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी बुलंदशहरच्या खुर्जामध्ये फटाक्यांची विक्री करणाऱ्या एका दुकानावर पोलिसांनी छापा मारला. दुकान विक्रेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या विक्रेत्याच्या मुलीचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. फटाक्यांवर बंदी असतानादेखील मोठ्या प्रमाणात फटाक्यांची विक्री होताना दिसून येत आहे.
दरम्यान, या व्हायरल व्हिडिओमध्ये पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतल्यावर चिमुकलीने त्यांना सोडवण्यासाठी पोलिसांच्या गाडीवर डोकं आपटल्याची घटना समोर आली आहे. माझ्या वडिलांना सोडा असं म्हणत ती मदतीसाठी याचना करत होती. पोलिसांनी चिमुकलीला पाहिलं. मात्र, त्यांनी आपली कारवाई सुरूच ठेवली. हे पाहून चिमुकलीने पोलिसांच्या गाडीवर जोरजोरात डोकं आपटून घेण्यास सुरुवात केली. मात्र, पोलिसांनी आपली कारवाई सुरूच ठेवली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर यावर नागरिकांचा विविध प्रतिक्रियादेखील येत आहेत.