नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पक्षाचे (पूर्व) खासदार गौतम गंभीर यांना प्राणघातक धमकी देण्यात आली आहे. गौतम गंभीर यांनी शाहदरा जिल्ह्यातील डीसीपी यांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. भाजप खासदाराने पत्रात म्हटले आहे की आंतरराष्ट्रीय नंबर मला व माझ्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देत आहे. याप्रकरणी एफआयआर नोंदवून माझ्या कुटुंबाची सुरक्षा सुनिश्चित करावी अशी विनंती त्यांनी केली.
विशेष म्हणजे गंभीरला दोन दिवसांपूर्वी फोनवर जिवे मारण्याची धमकी मिळाली होती, ज्याची त्याने आज तक्रार दिली आहे. गौतम गंभीर यांनी डीसीपी शाहदारा यांना एका पत्रात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय कॉलद्वारे त्याला आणि त्याच्या कुटूंबाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या कारणास्तव, पोलिसांनी यासाठी एफआयआर नोंदविण्यात यावा आणि तो आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेची व्यवस्था करावी अशी विनंती केली आहे.
BJP MP Gautam Gambhir in a letter to DCP Shahdara District: I have been receiving death threats for me & my family from an international number. I request you to file an FIR for the same & ensure safety and security to my family. pic.twitter.com/DSaj9HN3R3
— ANI (@ANI) December 21, 2019
गौतम गंभीरला दोन दिवसांपुर्वीच जीवे ठार मारण्याची धमकी फोनवरून देण्यात आली होती, याबाबतची तक्रार त्याने आज दिली. याबाबत गौतम गंभीरने शाहदरा पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. एका आंतरराष्ट्रीय कॉलवरून कुटुंबाला ठार मारण्याची धमकी आली असल्याने एफआयआर दाखल केली आहे. कुटुंबाला सुरक्षा पुरविण्याची विनंती त्याने पत्रात केली आहे.
Visit : bahujannama.com