मनसे -भाजपची युतीबाबत (BJP-MNS Alliance) बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, ‘एकला चलो यामधून आम्ही निवडणूका लढवल्या आहेत. मात्र तुर्तास तरी भाजपा सोबत युतीबाबत कोणतीही चर्चा नाही, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच, ‘तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळेल’ असं देखील विधान त्यांनी केलं आहे. या विधानामुळे युतीबाबात राजकीय वर्तुळात तर्कवितर्क चर्चा होताना दिसत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नुकतंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेतली.दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. परंतु, ही एक कौटुंबिक भेट असल्याचं सांगण्यात आलं होतं.त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी दिवाळी पाडव्याच्या दिवशी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राज ठाकरेंच्या घरी भेट घेतली होती.
दरम्यान, आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाराष्ट्र दौरा करणार आहेत.6 डिसेंबरपासून त्यांचा दौरा सुरु होणार आहे.त्यानंतर 14 डिसेंबरपासून राज ठाकरे मराठवाड्याचा दौरा करतील आणि मग पुन्हा 16 जिसेंबर रोजी पुण्यात राज ठाकरे एक बैठक घेणार आहेत.राज ठाकरे राज्यातील 6 विविध ठिकाणी बैठका घेणार आहेत. आता दोन ठिकाणीच्या तारखा ठरल्या आहेत.त्यानंतर राज ठाकरे कोकणात जातील.पण त्या दौऱ्याची तारीख अद्याप ठरलेली नाही, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. (BJP-MNS Alliance)
Web Title :- BJP-MNS Alliance | will there be a bjp mns alliance in maharashtra bala nandgaonkar said you will get good news soon
KVP | ‘ही’ योजना शेतकर्यांसाठी अतिशय खास, यामध्ये थेट दुप्पट होतील पैसे; जाणून घ्या कसा घ्यावा लाभ?