बीड न्यूज :बहुजननामा ऑनलाइन – BJP MLA Suresh Dhas |भाजप विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस (BJP MLA Suresh Dhas) यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. आमदर सुरेश धस (BJP MLA Suresh Dhas) यांच्यासह 38 समर्थकांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीवरुन आष्टी पोलीस ठाण्यात (ashti police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात (Beed District) खळबळ उडाली आहे.
माधुरी मनोज चौधरी (Madhuri Manoj Chaudhary) असं तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत (Local body elections) आमदार धस यांच्या
विरुद्ध निवडणुकीत उभे असल्याचा राग मनात धरुन धस आणि त्यांच्या समर्थकांनी हॉटेल
आणि स्थानिक संपत्तीची तोडफोड केल्याचा आरोप माधुरी चौधरी यांनी केला आहे.
माधुरी चौधरी यांच्या तक्रारीवरुन आष्टी पोलिसांनी धस यांच्यासह 38 समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मानसिक त्रास दिल्याचा आरोप
2017 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागली होती.
सुरेश धस यांच्या पॅनलच्या विरोधात पांढरी येथील माधुरी चौधरी या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.
या निवडणुकीत विरोधात असल्याचा राग मनात धरुन सुरेश धस आणि त्यांचे समर्थक पती मनोज चौधरी (Manoj Chaudhary) यांच्यावर खोट्या तक्रारी देऊन मानसिक त्रास देत असल्याचा आरोप माधुरी चौधरी यांनी केला आहे.
–
प्रशासनाविरोधात गृहमंत्र्यांना पत्र
19 जुलैच्या रात्री सुरेश धस आणि त्यांचे समर्थक पांढरी येथे आले आणि त्यांनी माधुरी चौधरी
यांच्या संपत्तीची तोडफोड केली, अशी तक्रार त्यांनी दिली आहे.
त्यांच्या तक्रारीवरुन आष्टी पोलिसांनी सुरेश धस यांच्यासह 38 समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान अनेक वेळा तक्रार देऊन देखील प्रशासन कारवाई करत नसल्याने चौधरी यांनी थेट गृहमंत्र्यांना पत्र लिहिले होते.
Web Title : BJP MLA Suresh Dhas | case has been registered against 38 supporters including mla suresh dhas at aashti in beed district.