BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार

July 30, 2024

पुणे : ज्येष्ठ नागरिक तीर्थ यात्रा योजनेतील प्रसिद्ध पत्रकात मुख्यमंत्र्यांसमवेत बेपत्ता व्यक्तीचा फोटो वापरल्याच्या प्रकरणानंतर आता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या (Majhi Ladki Bahin Yojana) बॅनरवरील फोटोवरुन भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याविरोधात महिलेने तक्रार केली आहे. या महिलेने पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांची भेट घेऊन ही तक्रार दिली आहे. शर्मा यांनी त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

https://www.instagram.com/p/C-CR-DUiuJ5/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी शिवाजीनगर मतदारसंघामध्ये (Shivajinagar Assembly Constituency) मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे अनेक बॅनर लावले आहेत. त्या बॅनरवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांसमवेत स्वत:चा फोटो छापला आहे. नात्याचा मान, माय – भगिनीचा सन्मान असे शिर्षक असलेल्या या बॅनरमध्ये दोन महिलांचे फोटो छापले आहेत. आपले फोटो हे विनासंमती छापल्याचा दावा एका महिलेने केला आहे.

शिवाजीनगर भागात हे बॅनर मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले आहेत. या प्रसिद्धीमुळे माझ्या कुटुंबात गेरसमज व त्रास, वादा वाद सुरु झाला आहे. अयोग्य चुकीचे मनमर्जी, बोगस काम केलेले शिरोळे यांच्याबद्दल ही लेखी तक्रार देत असल्याचे या महिलेने सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्तांना याची चौकशी करण्याचे आदेश शर्मा यांनी दिले आहेत.