सातारा : बहुजननामा ऑनलाईन – अचानक सुरु झालेल्या रक्तदाबाच्या त्रासामुळे भाजपचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असून,वाढलेल्या रक्तदाबामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले, म्हणून त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी वेदांतिका राजे आहेत.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार , सध्या राजेंची प्रकृती स्थिर असून त्यांना पूर्णपणे बरे वाटल्यावरतीच घरी सोडणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. राजकारणी मंडळी असल्यामुळे दिवसभर कामांचा व्याप सुरूच असतो , त्यातून उसंत मिळत नाही. प्रचार,दौरे यासाठी सतत फिरावे लागते. भर सभेत सुद्धा आपण काही जणांना त्रास झाल्याचे पाहिलेले आहे, त्यामुळे या धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे जरुरीचे असते.