सांगली न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे काल पंढरपूर (Pandharpur) दौऱ्यावर होते. ठाकरे हे गाडी चालवत आषाढीच्या महापूजेसाठी पंढरपूरला गेले होते. यावरून भाजप नेते (BJP) आणि विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही, अशा शब्दात गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी जोरदार टीका केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
‘मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही. पण यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही. याच ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा महापालिका कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतत आहे. जे आपल्या जीवाची पर्वा न करता पालिका कर्मचारी म्हणजे ‘कोविड वॉरीयर’ यांच्या सुरक्षा हमी अधिकारचं वाटोळं करायला हे ठाकरे सरकार निघालंय, अशा शब्दात आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.
पुढे गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘केंद्र सरकारची प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना महापालिका कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारला केवळ अंमलात आणायची आहे.
म्हणून यासाठी लागणारा निधी हा केंद्राकडूनच आहे. परंतु, तरी देखील राज्य सरकारने याकडं संपूर्ण दुर्लक्ष केलं आहे.
तसेच, 5 वेळा मा. हाय कोर्टाने तंबी देऊन देखील ही योजना अंमलात आणण्यासाठी ठाकरे सरकार आपल्या जबाबदारीपासून टाळाटाळ करत आहे.
तर सामान्य गरीब जनता मेटाकुटीला आली असताना हे प्रस्थापितांचं सरकार गेंड्याची कातडी पांघरून बसलंय, असा घणाघात देखील आमदार पडळकर यांनीं केलाय.
Web Title : BJP MLA Gopichand Padalkar on chief minister uddhav thackeray
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | चोरी करताना हटकल्याने चोरट्यांकडून मेट्रोच्या कामगारांना मारहाण, हॅरिस ब्रिजवळील घटना