मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे नांदेडमध्ये गेले होते. दरम्यान आम्हाला संविधानाच्या चौकटीतच सरकार चाललं पाहिजे. संविधानानुसार सरकार चालले नाही तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, अशी सूचना काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिली असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
कोणीही शिवसेनेला टपली मारून जातं हल्ली. शिवसेना पक्ष लिहून चाटून सत्तेत आला ह्यात काही नवल नाही. शिवसेना चाटूगिरी करूनच सत्तेत आली हे जग जाहीर आहे. खोलीत दोन हाणा पण बाहेर साहेब म्हणा ही त्यांची जुनी सवय आहे. https://t.co/KdfUaeEQ2N
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 27, 2020
तसेच सोनिया गांधी यांनी दिलेल्या सूचना उद्धव ठाकरे यांना दिल्या असून उद्धव ठाकरे यांना काहीच हरकत नसून ते त्याच्याबाहेर जाणार नाहीत, असेही चव्हाण यांनी सांगितले. तर घटना हीच शिवधार्य मानून घटनेच्या चौकटीत राहून सरकार चालणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. पण चव्हाण यांनी केलेल्या विधानावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर निलेश राणे यांनी ट्विटरद्वारे विधान केले आहे. खोलीत दोन हाना पण बाहेर साहेब म्हणा, ही त्यांची जुनी सवय आहे, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.
Visit : bahujannama.com