नगर : बहुजननामा ऑनलाईन – कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गेल्या वर्षी कीर्तनादरम्यान पुत्रप्राप्तीसंबंधी एक वादग्रस्त विधान केलं होत. याविधानावरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवरून पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणावरून कनिष्ठ कोर्टाने खटला चालवण्याचा आदेश दिला होता. मात्र हा आदेश सत्र न्यायालयाने रद्द ठरविला गेल्याने भाजप नेत्यांकडून इंदुरीकरांचा सत्कार करण्यात येत आहे. मात्र स्वत: इंदुरीकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा आदेश फेटाळून लावत हा आदेश रद्द केला आहे. या निर्णयावरून इंदुरीकर यांच्या समर्थकांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले आहे. तर ‘कसला गुन्हा, कीर्तन पुन्हा’ अशा वाक्यामधून समाज माध्यमावर इंदुरीकर यांना सपोर्ट देत आहेत. तर भाजपसह हिंदुत्ववादी संघटनामध्येही आनंदीचे वातावरण आहे. तर इंदुरीकर आणि त्यांचे वकील के. डी. धुमाळ यांचे देखील सत्कार केले जात आहेत. भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी इंदुरीकर यांच्या घरी जाऊन सत्कार केला आहे. त्याचबरोबर,अकोले तालुक्याच्यावतीने भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांनीही त्यांचा सत्कार केला. तर त्यावेळी अभिनंदन करताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्याकडून निकालाची माहिती घेतली. यापुढे लढाईत इंदुरीकर महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे भाजप नेत्याने म्हटले आहे.
दरम्यान, भाजप नेत्यांनी आणि हिंदुत्वावादी संघटनांनी मधील काळात इंदुरीकरांसोबत राहण्याची भूमिका घेतली होती. तर सध्याही आगामी काळात सोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. तर संगमनेर सत्र न्यायालयाच्या निर्णयावरून हाय कोर्टात आव्हान दिले जाण्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र सरकारकडून अजून त्यासंबंधी काहीही निर्णय झालेला नाही. अंनिसने मात्र आव्हान देण्याची भूमिका याआधीच जाहीर केली आहे. तर सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या नव्या निर्बंधांमुळे कीर्तनाचे कार्यक्रमही बंद आहेत. परंतु त्यांच्या समर्थकांकडून आनंद व्यक्त करत महाराजांच्या कार्यक्रमांला लवकरच पुन्हा प्रारंभ होईल असे म्हटले गेले आहे.