नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावरून देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच इंस्टाग्रामवर (instagram) भगवान शिवशंकरांचा आक्षेपाहार्य फोटो आढळल्याने दिल्लीच्या पार्लमेंट स्ट्रिट पोलीस ठाण्यात भाजप नेते मनीष सिंह यांनी दिलेल्या तक्रारीवरून इंस्टाग्रामचे (instagram) सीईओ आणि इतर अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
https://twitter.com/shahcastic/status/1402211686308749313
मनीष सिंह यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हंटले आहे की,
इंस्टाग्रामवर (instagram) शिव शब्द सर्च केल्यास शिवशंकरांचा आक्षेपाहार्य फोटो दिसत आहे. यात भगवान शिवशंकरांच्या एका हातात वाईनचा ग्लास आणि दुसऱ्या हातात फोन दाखविण्यात आला आहे. सिंह यांनी यासंदर्भात काही फोटोही शेअर केले आहेत. गुगलनेही काही दिवसांपूर्वी यासारख्याच प्रकारावरून माफी मागितली होती.
गुगलवर देशातील सर्वात खराब भाषा असे सर्च केल्यानंतर कन्नड भाषेचे नाव येत होते.
यावरून सोशल मीडियावर मोठे वादंग निर्माण झाले होते.
त्यामुळे गुगलने जाहीर माफी मागत गैरसमज आणि भावना दुखावल्यामुळे कंपनीने दिलगीरी व्यक्त केली होती.
(instagram) सीईओ आणि इतर अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
कृपया हे देखील वाचा:
Undo Tweet फीचरसह आले Twitter Blue, परंतु यासाठी तुम्हाला द्यावे लागतील पैसे, जाणून घ्या
PM मोदी आणि ओबामांच्या सुद्धा पुढे गेला विराट, ‘या’ ठिकाणी पोहचणारा जगातील पहिला क्रिकेटर
BJP चा मोठा निर्णय ! राज्यांतील विधानसभा निवडणुकामध्ये आता पीएम मोदींचा चेहरा वापरण बंद