पुणे : बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांनी नुकतीच शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली.
या भेटीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) अन् शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.
आमची मैत्री जंगलातल्या वाघाची आहे, पिंजऱ्यातल्या नाही, सध्याची शिवसेनेची अवस्थाही पिंजऱ्यातल्या वाघा सारखी आहे.
त्यामुळे त्यांच्याशी मैत्री करायची हौस असे चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी म्हटले होते.
पाटील यांच्या या विधानावर राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, पाटील हे गोड आहेत.
त्यानी असंच कार्यकर्त्यांशी गोड-गोड वागावं, गोड बोलावं आणि कुणाशी मैत्री करायची हे वाघ ठरवतो, असा टोला राऊत यांनी लगावला होता.
पुण्यात घरोघरी लसीकरण या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते.
यावेळी पाटील म्हणाले की, सध्याची शिवसेनेची अवस्थाही पिंजऱ्यातल्या वाघा सारखी आहे. त्यामुळे त्यांच्याशी मैत्री करायची हौस नाही, असे म्हणत पाटलांनी राऊतांना जोरदार चिमटा काढला. तसेच अजित पवार यांच्यावर सध्या संजय राऊत यांची सावली पडली असून त्यांनाही राऊतांचा गुण लागल्याचा खोचक टोलाही पाटील यांनी लगावला.
दरम्यान आज चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस असल्यामुळे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
पहिल्यांदाच पुण्यात पाटील यांचा इतका मोठा वाढदिवस साजरा होत आहे.
पालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पाटील यांच्याशी जवळीक साधण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू असल्याचे दिसून आले.
कृपया हे देखील वाचा:
राष्ट्रवादी काँग्रेसची गरज
केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्यानं 42 वर्षीय महिलेला अडीच लाखाचा गंडा
लॉकडाऊन उघडताच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं दिला वाहन चालकांना इशारा