नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाइन – देशात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे वायव्य दिल्लीचे खासदार उदित राज यांनी आज राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपनं तिकीट नाकारल्यानं ते नाराज होते. अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दलित विरोधी (भाजपा) पार्टी को दरकिनार करते हुए, कांग्रेस पार्टी में शामिल हुआ।
दलितों का सम्मान करने वाली कांग्रेस पार्टी में शामिल होकर मेरा मन प्रसन्न हुआ।
अब होगा दलितों का सम्मान 23 मई भाजपा गई।#ModiNeverAgain#23_मई_भाजपा_गई pic.twitter.com/GIL6HpeDK4— Dr. Udit Raj (@Dr_Uditraj) April 24, 2019
खाजगी क्षेत्रात दलित ,आदिवासी लोकांना आरक्षण मिळावे म्हणून नेहमी तत्पर राहून दलित -आदिवासी लोकांच्या अडी -अडचणी वेळोवेळी सरकारपुढे मांडणारे खासदार उदित राज हे मागील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडीन आले .मात्र, खासदार झाल्यानंतर त्यांनी अनेकदा सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात भूमिका घेतली होती. एससी-एसटी विधेयकातील सुधारणांच्या विरोधात मागील वर्षी विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदला उदित राज यांनी पाठिंबा दर्शवला होता. सरकारी नोकऱ्यांमध्ये दलितांच्या भरतीचा मुद्दाही त्यांनी लावून धरला होता. त्यामुळं पक्षनेतृत्व त्यांच्यावर नाराज होतं, असं बोललं जातं. त्यातूनच त्यांचं तिकीट कापलं गेलं. त्यांच्या जागी भाजपनं प्रसिद्ध पंजाबी गायक हंसराज हंस यांना उमेदवारी दिली आहे.