मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – रेमडेसिवीर इंजेक्शनचा ६० हजार वायरसचा साठा असल्याच्या संशयातून ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला काही दिवसापूर्वी बीकेसी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सह भाजपचे प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे बीकेसी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना विचारणा केली. त्यावेळी फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. यावरून आयपीएस माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड थेट इंडियन एक्स्प्रेसद्वारे उठवली होती. यावरून आता फडणवीस यांनी सुद्धा रिबेलो यांना उत्तर देताना त्यांनी इंडियन एक्स्प्रेसद्वारेच पत्राच्या साहाय्याने उत्तर दिले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पत्रात ?
ज्युलिओ रिबेरो यांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले, माझ्या मुख्यमंत्री कार्यकाळाबद्दल आपण ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्याबद्दल मी आपला आभारी आहे. तुमचे हे शब्द मला भविष्यात प्रेरणा देत राहतील. यावेळी मला तुमच्याप्रती असणारा आदरही व्यक्त करायचा आहे. आपलं काही मुद्द्यांवर मतांतर असू शकतं. परंतु, तुमच्या स्पष्टवक्तेपणा आणि वचबद्धतेने नेहमीच मला प्रभावित केलं आहे. मी तुमच्या लेखात व्यक्त केलेल्या मतांचा प्रतिकार करण्यासाठी हे पत्र लिहित नाही. मी कोणतीही रचनात्मक टीका योग्य पद्दतीन घेतो. राज्य सरकराने अनेक चुकीच्या गोष्टी पसरवल्या असून जो चुकीचा प्रचार केला आहे त्याबाबत मी तथ्य पुढे आणण्यासाठी आणि वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी हे पत्र लिहित आहे. तसेच, सगळ्यात आधी मी आणि दरेकर एकही रेमडेसिविर भाजपासाठी खरेदी करणार नव्हतो. आम्ही FDA ला लिहिलेल्या पत्रातही फक्त समनव्य घडवून आणत असून FDA ने खरेदी करावी असा उल्लेख केला आहे.
यावरून, पुढे फडणवीस म्हणाले, प्रशासकीय पातळीवर काही अडचण असल्यास आम्ही खरेदी करतो आणि सरकारला देतो असाही प्रस्ताव दिला. प्रवीण दरेकर यांनी उत्पादक कंपनीसोबत FDA मंत्र्यांचा संवाद घडवून आणला. यासंबंधी FDA कडून त्या उत्पादक कंपनीला अधिकृत पत्र देत केवळ महाराष्ट्राला हा पुरवठा करण्यास म्हटलं होतं. त्यामुळे महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य कोणाला पुरवठा होण्याची शक्यता नव्हती. FDA मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीतही हा साठा राज्य सरकारसाठी होता असं देखील स्पष्ट केलं आहे. तर मी DCP ऑफिसला का गेलो? कंपनीच्या एका संचालकाला मंत्र्याच्या ओएसडीने फोन करुन विरोधी पक्षनेत्याच्या सांगण्यावरुन तुम्ही रेमडेसिविर का देत आहात अशी विचारणा केली. तुम्ही केवळ सरकारच्या सांगण्यावरुन दिलं पाहिजे असं ते म्हणाले.
तसेच, यावेळी त्यांनी आपण सरकारलाच रेमडेसिविर देत असून यासंबंधी FDA मंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती दिली. त्याच संध्याकाळी एक API ट्रॅप करण्यासाठी साध्या कपड्यांमध्ये पोहोचले आणि रेमडेसिविरची मागणी केली. परंतु, त्यांनी यासाठी नकार दिला. हा ट्रॅप फसल्यानंतर ८ ते १० पोलीस आणि एक अधिकारी त्यांच्या घऱी गेले. त्यांनी त्यांचा फोन तपासला आणि पोलीस ठाण्यात घेऊन गेले. प्रवीण दरेकर यांनी माझी भेट घेतली आणि काहीतरी गोंधळ असल्याचं म्हटलं. तेव्हा मी ACP ना २ ते ३ ते तीन वेळा पूर्ण घटना काय आहे, हा सर्व घटनाक्रम सांगितला. यावेळी मी तेथील पोलीस आयुक्तांनाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तेथून, उत्तर मिळालं नाही. त्यानंतर मी काही अधिकाऱ्यांशी सवांद साधल्यानंतर ही नियोजित कारवाई असून सरकारमधील काही मंत्र्यांच्या म्हणण्यावरून कारवाई केल्याचा मला अंदाज आला. कायदेशीररित्या राज्याला अत्यंत आवश्यक असणाऱ्या औषधाचा पुरवठा करण्यासाठी तयार झालेल्या व्यक्तीचा असा छळ होऊ न देणे ही माझी नैतिक जबाबदारी होती. असे फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मी जाहीर न करताच पोहोचलो नव्हतो. मी DCP ना मेसेज करुन याबाबत सांगितलं होतं. तसंच कोणतंही उत्तर न मिळाल्याने DCP ऑफिसला येत असल्याचं सांगितलं होतं. मी सहपोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांनाही याबाबत माहिती दिली होती. ऑर्डरबाबत कोणतीही माहिती नाही सांगणाऱ्या पोलीस आयुक्तांकडे आम्ही FDA ऑर्डरची प्रत सुपूर्द केली. यानंतर आम्ही त्यांनी त्यांच्याकडे कंपनीने साठा केला आहे का? विचारणा करत केला असेल तर कारवाई करा अस देखील म्हटलं आहे. या दरम्यान, अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर कंपनीच्या संचालकाला सोडून दिलं आणि गरज लागली तर चौकशीसाठी पुन्हा बोलावलं जाईल असं सांगितलं. माजी मुख्यमंत्र्याने पोलीस स्टेशन किंवा DCP कार्यालयात जावं का यावर वाद-विवाद होऊ शकतो. मात्र केवळ आमच्या सांगण्यावरुन राज्याच्या मदतीसाठी तयारी दर्शवली यामुळे एखाद्या व्यक्तीचा होणारा छळ रोखण्यासाठी जाणुबुजून मी हा निर्णय घेतला होता. असा खुलासा करत देवेंद्र फडणवीस माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांच्या प्रश्नावर उत्तर दिले आहे.