बहुजननामा ऑनलाईन टीम : सत्ता स्थापन करण्यास अपयश आल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांतील वाद काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज भाजपाची उत्तर महाराष्ट्रासाठी कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीत नक्की काय होतंय, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
जळगाव शहरातील बालांनी लॉन येथे आज दुपारी साडे बारा वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघटनमंत्री विजय पुराणिक, एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील आमदार, खासदार आणि कोअर कमिटी सदस्य उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या बैठकीत पक्ष संघटन, पक्षांतर आणि गत निवडणुका हे विषय आहे. तरी रोहिणी खडसे यांचा पराभव करण्यात आल्याच्या आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. त्यामुळे हा मुद्दादेखील उपस्थित होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्यात भाजप यशस्वी होतं का, हे पाहणं महत्वाचं आहे.
पक्षाला जास्त जागा मिळूनही सत्ता स्थापन करता आली नाही, तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद गमावल्यानंतर भाजप मध्ये नाराजी वाढली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी थेट माध्यमांसमोर येत फडणवीसांवर टीका केली आहेत. तर दुसरीकडे, पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपल्या समर्थकांना सूचक संदेश दिला. तसेच त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून भाजपचा उल्लेख नसल्याने पंकजा मुंडे भाजप सोडणार कि काय ? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. मात्र आता हा वाद वाढत चालल्याने राज्यातील भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते बंडाचा झेंडा हाती घेणार की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे.
Visit : bahujannama.com