नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गृहमंत्री अमित शहा यांच्यानंतर भाजप आपला नवीन अध्यक्ष निवडणार आहे. त्यासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 20 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. मुख्य म्हणजे पक्षाच्या वतीने कार्यवाह अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे नाव या शर्यतीत आहे. त्यांचे अध्यक्षपदी निवडले जाणे जवळपास निश्चित आहे. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी भाजपाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ 20 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 12.30 पर्यंत ठेवण्यात आली आहे.
त्याच दिवशी उमेदवारी अर्जांची छाननी सकाळी 12.30 ते दुपारी 1.30 या वेळेत केली जाणार आहे. 1.30 ते 2.30 पर्यंत अर्ज माघारीची वेळ असेल. भाजपचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांच्यानुसार दुसर्याचे नाव समोर आल्यास 21 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता निवडणूक होईल. परंतु आतापर्यंत पक्षाकडून अन्य कोणत्याही नेत्याचे नाव समोर आले नाही, अशा परिस्थितीत ही निवडणूक केवळ औपचारिकता आहे. अशा परिस्थितीत 20 जानेवारी रोजी जे.पी. नड्डा यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. यानंतर ते 22 जानेवारीपासून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारू शकतात.
राधामोहन सिंग यांच्या मते, भाजपच्या निवडणूक कार्यक्रमाच्या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात 75 टक्के बूथ समित्या स्थापन केल्या आहेत. 50 टक्के मंडळ समित्या स्थापन केल्या आहेत. त्यानंतर भाजपाच्या घटनेनुसार 60 टक्के जिल्ह्यात निवडणुका घेण्यात आल्या आहेत. 21 प्रांतांचे प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय परिषद सदस्यांच्या निवडणुकाही घेण्यात आल्या आहेत.
2014 च्या निवडणुकीत भाजपाच्या जबरदस्त विजयानंतर अमित शहा यांना भाजप अध्यक्ष करण्यात आले. तेव्हापासून त्यांनी हे पद सांभाळले आहे. 2019 मध्ये भाजपाच्या मोठ्या विजयानंतर अमित शहा देशाचे गृहमंत्री झाले आहेत. भाजपा नवीन अध्यक्ष शोधत आहे. जरी भाजपाने यापूर्वी नड्डा यांना कार्यवाहक अध्यक्ष केले होते. त्यानंतर आता त्यांना अध्यक्षपदी नियुक्त केले जात असल्याचे संकेत आहेत.