मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – BJP Anil Bonde On Shivsena Sanjay Raut | राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार (Shivsena Sanjay Pawar) आणि भाजपाचे धनंजय महाडिक (BJP Dhananjay Mahadik) यांच्यात झालेल्या लढतीत भाजपाच्या महाडिक यांचा विजय झाला. या पराभवावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हा पराभव अपक्ष आमदारांमुळे झाल्याचे म्हटले होते. यावेळी त्यांनी काही अपक्ष आमदारांची (Independent MLA) नावे सुद्धा घेतली होती. आता यावर भाजपा नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी प्रखर टीका केली आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. भाजपाच्या अनिल बोंडे यांनी नागपुरात शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, संजय राऊत यांना तर सत्तेचा माज आला आहे, ते द्वेषाने पेटलेत, म्हणूनच त्यांनी अपक्ष आमदारांचा अपमान केला. अपक्ष आमदार घोडेबाजारामध्ये खपले, किंमत घेतली असा आरोप करून बदनामी करण्याचा गाढवपणा त्यांनी केला.
राज्य सरकारवर केली टीका
बोंडे यांनी पुढे म्हटले की, महाविकास आघाडीतील आमदारांकडून त्यांचे मंत्री कमिशन घेतात, मग सामान्य जनतेचे काय हाल होत असतील ? पक्षातील आमदारांनाच त्यांचे मंत्री, मुख्यमंत्री भेटत नाहीत. महाराष्ट्रातील जनता सरकारला वैतागली आहे.
फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत
महाविकास आघाडीच्या सावळ्या गोंधळामुळे राज्याचे वाटोळे होत आहे.
सगळ्यांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मुख्यमंत्री काळाचीच आठवण येत आहे.
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनावेत, अशी जनतेची इच्छा आहे, असे बोंडे म्हणाले.
Web Title :- BJP Anil Bonde On Shivsena Sanjay Raut | bjp leader mp anil bonde slams mp sanjay raut after rajya sabha election result 2022
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- Pune Traffic Police | ‘…तर ‘त्या’ वाहतूक पोलिसांवर खंडणीचा गुन्हा दाखल होणार’ ! पोलिस आयुक्त, सह आयुक्तांकडून ट्रॅफिक पोलिसांकडून वाहन चालकांवर होणार्या कारवाईच्या ‘स्पीड’ला ‘ब्रेक’सह ‘जॅमर’
- WhatsApp New Features | WhatsApp ची नवीन सुविधा ! फोन, लॅपटॉप आणि PC वर सुद्धा घेऊ शकता चॅटचा बॅकअप, जाणून घ्या सविस्तर
- PMVVY | LIC च्या या योजनेत ज्येष्ठांना दरमहिना मिळेल 9250 रुपये पेन्शन, पती-पत्नीला मिळू शकतो दुप्पट लाभ, जाणून घ्या सर्वकाही