नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – नागपुर इथं सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन वादळी ठरलंय. आठवडाभर हे अधिवेशन चालणार आहे. ठाकरे सरकारचं हे पहिलच अधिवेशन असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलंय. यासाठी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष भाजपला देखील स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण भाजप स्वीकारेल की नाही यावर चर्चा सुरु होती परंतु मुख्यमंत्र्यांच्या डिनर डिप्लोमसीला यश आलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलेलं स्नेहभोजनाचं आमंत्रण भाजपने स्वीकारालं आहे. भाजप आणि शिवसेनेचे गेल्या 30 वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सध्या त्यांच्यात दुरावा निर्माण झाला तरी जुने संबंध असल्याने हे निमंत्रण देण्यात आल्याचं बोललं जातंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या डिनर डिप्लोमसीमुळे मात्र राजकीय चर्चेला वेगळीच रंगत आलीय. नागपूर अधिवेशन हे राजकीय कामकाजाबरोबरच स्नेहभोजन आणि रात्रींच्या गप्पांसाठीही ओळखलं जातं त्यामुळे याकडे बघितलं जातंय.
मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या निमंत्रणाचा स्वीकार करून भाजपचे सदस्य जेवणाला जातात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आता भाजपकडून या स्नेहभोजनाचं आमंत्रण स्वीकारण्यात आल्यानं सर्वपक्षीय नेते आज स्नेहभोजनाला उपस्थित असतील. नागपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी सर्व पक्षीय नेते उपस्थित असणार आहेत.
Visit : bahujannama.com