नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम, पीपीएफ, सुकन्या समृध्दी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि एनएससी यासारख्या योजनांवर व्याज दर कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी सरकारने या छोट्या बचत योजनांवरील व्याज दर जाहीर केले असून त्यामध्ये या योजनांच्या दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही. सरकार दर तीन महिन्यांनी या योजनांवर व्याज दर जाहीर करते.
या तिमाहीत दरात कोणताही बदल न करता ग्राहकांना पीपीएफ आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांवर (एनएससी) ७.९ टक्के दराने व्याज मिळणार आहे. दुसरीकडे, सुकन्या समृद्धि योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना इतर लहान बचत योजनांच्या तुलनेत जास्त व्याज देणार आहे. सुकन्या समृद्धि योजनेला सध्या ८.४ टक्के आणि ज्येष्ठ नागरिक योजनेत ८.६ टक्के दराने व्याज मिळणार आहे.
पोस्ट ऑफिसच्या ५ वर्षाच्या मासिक उत्पन्न योजनेवर ७.६ टक्के व्याज दर लागू होईल. किसान विकास पत्रावर ग्राहकांना ७.६ टक्के दराने व्याज मिळणार आहे. पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवींवर एक ते तीन वर्षांच्या मुदतीवरील व्याज दर ६.९ टक्के दराने राहील. तसेच, पाच वर्षांच्या मुदतीच्या ठेवींसाठी व्याज दर ७.७ टक्के असेल तर पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षांच्या आरडीसाठी व्याज ७.२ टक्के राहील.
या तिमाहीत छोट्या बचत योजनांच्या व्याज दरात बदल झाल्यामुळे आता जुने दर १ ऑक्टोबर २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत लागू होतील. ज्येष्ठ नागरिक बचत योजना, पीपीएफ आणि सुकन्या समृद्धि योजना ही लहान गुंतवणूकदारांसाठी चांगली परतावा योजना आहे.
Visit : bahujannama.com