नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्हाला Income Tax विभागाकडून एखादा ईमेल किंवा मेसेज मिळालाय ? यामध्ये तुमच्याकडून काही माहिती मागितली असेल तर सर्वप्रथम ईमेल किंवा मेसेजची सत्यता पडताळून बघा. तुम्हाला हे पहावे लागेल की कुणी Phishing चा प्रयत्न तर करत नाही. इन्कम टॅक्सने लोकांचा हा गोंधळ दूर करण्यासाठी करदात्यांना ईमेल पाठवून विभागाच्या सर्व अधिकार्यांना ईमेल आयडी, एसएमसएस सेन्डर आयडी आणि वेबसाइटची माहिती दिली आहे.
विभागाने ईमेलमध्ये लिहिले आहे की, दिलेल्या यादीशिवाय जर अन्य कोणत्या आयडीवरून मेल किंवा मेसेज आला तर तो ओपन करू नका, कोणतीही माहिती देऊ नका. इन्कम टॅक्स विभागाकडून पाठविण्यात आलेल्या ई मेलमध्ये म्हटले आहे की, क्लिक करण्यापूर्वी नेहमी पडताळणी करा. केवळ याच स्त्रोतांवर विश्वास ठेवा. अनेक करदात्यांनी, इन्कम टॅक्सचे अधिकारी असल्याचे सांगून आमच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. यानंतर आयकर विभागाने ही यादी जाहीर केली आहे.
इन्कम टॅक्सचे अधिकृत ईमेल आयडी :
@incometax.gov.in, @incometaxindiaefiling.gov.in, @tdscpc.gov.in, @cpc.gov.in, @insight.gov.in, @nsdl.co.in, @utiitsl.com. या मेल आयडीवरून आलेल्या ईमेलला उत्तर देणे, करदात्यांसाठी सुरक्षित आहे.
इन्कम टॅक्स विभागाकडून पाठवण्यात येत असलेल्या मेसेजचे सेन्डर आयडी :
ITDEPT, ITDEFL, TDSCPC, CMCPCI, INSIGT, SBICMP, NSDLTN, NSDLDP, UTIPAN
आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट www.incometaxindia.gov.in आहे. तर, इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी अधिकृत वेबसाइट www.incometaxindiaefiling.gov.in आहे.
याशिवाय TDS शी संबंधित माहितीसाठी www.tdscpc.gov.in वर संपर्क करता येईल. याशिवाय रिपोर्टिंगसाठी तुम्ही www.insight.gov.in वर लॉग ऑन करू शकता. याशिवाय पॅन कार्डशी संबंधित सेवांसाठी www.nsdl.co.in किंवा www.utiitsl.com वर लॉग ऑन करा. आयकर विभागाने म्हटले आहे की जर तुम्हाला अन्य आयडी वरून ईमेल आला तर तुम्ही तो webmanager@incometax.gov.in किंवा incident@cert-in.org.in वर फॉरवर्ड करू शकता.
Visit : bahujannama.com