नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्या-चांदीच्या भावात शुक्रवारी जबरदस्त घट नोंदवली गेली असून सोन्याचा दर शुक्रवारी १,०९७ रुपये प्रति १० ग्रामची नोंद केली गेली. या घसरणीसोबत राष्ट्रीय राजधानीसोबत सोन्याचा भाव शुक्रवारी १३ मार्चला ४२,६०० रु. प्रति १० ग्रामवर खाली आला. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार गुंतवणूकदारांना दुसऱ्या ऍसेट्सकडे वळल्यामुळे आणि रुपया बळकट झाल्याने सोन्यात ही घट नोंदवली गेली आहे. विशेष म्हणजे सोने मागील सत्रात ४३,६९७ रु. प्रति १० ग्रामवर बंद झाले होते.
सोन्यासह चांदीच्या भावातही शुक्रवारी प्रचंड घट झाली असून चांदीच्या भावात १,५७४ रु.नी घट झाली आहे. त्यामुळे चांदीचा भाव ४४,१३० रु. प्रतिकिलोवर झाली असून विशेष म्हणजे चांदी गुरुवारी ४५,७०४ रु. प्रतिकिलोवर बंद झाली.
एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याच्या हाजीर भावातही एक हजार रुपयांपेक्षा कमी झाली. पटेल यांच्या मते रुपयाच्या मजबुतीमुळे ही घसरण नोंदली गेली आहे.
सोन्याचा आंतरराष्ट्रीय भाव शुक्रवारी १,५८४ डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव शुक्रवारी १५.६५ डॉलर प्रति औंस होता. त्याचबरोबर शुक्रवारी दुपारी भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 36 पैशांनी व्यापार करत होता.
वायदा बाजारात शुक्रवारी संध्याकाळी ३ एप्रिल २०२० रोजी सोन्याचा वायदा भाव १ टक्का किंवा ४२२ रु.नी खाली येत ४१,७८४ रु. प्रति १० ग्राम होता. तसेच ५ जून २०२० रोजी सोन्याचा वायदा भाव प्रति १० ग्रॅम ४२,३३१ रुपयांवर होता. तो १.१५ टक्क्यांनी किंवा ४९२ रु.नी घसरला होता.