नवी दिल्ली : वृत्तसंस्था- अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी सोमवारी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत अमेझॉन लवकरच इलेक्ट्रिक डिलिव्हरी रिक्षा घेऊन येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच शून्य कार्बन उत्सर्जनासह ई-रिक्षा भारतात आणणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अमेझॉन सात वर्षांपूर्वी भारतात आली असून त्यांनी इथे ५ बिलियन डॉलरपेक्षा जास्त पैसे गुंतवले आहेत.
Hey, India. We’re rolling out our new fleet of electric delivery rickshaws. Fully electric. Zero carbon. #ClimatePledge pic.twitter.com/qFXdZOsY4y
— Jeff Bezos (@JeffBezos) January 20, 2020
Proud of the program we have in India to hire and train deaf associates at our delivery stations. Managers learn basic sign language to be able to communicate. Meeting this group was a moving experience for me. pic.twitter.com/gGm0dvCjkX
— Jeff Bezos (@JeffBezos) January 19, 2020
जेफ बेझोस यांनी आपल्या ट्विटमध्ये “हे भारत, आम्ही इलेक्ट्रिक डिलिव्हरी रिक्षाच्या स्वरूपात नवीन उत्पादन घेऊन येत आहोत. ही पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे आणि शून्य कार्बन उत्सर्जित करते,” असे म्हटले आहे. बेझोस यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘ClimatePledge’ हा हॅशटॅग वापरला असून ट्विटमध्ये एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये बेझोस आपल्या सहकाऱ्यांसोबत इलेक्ट्रिक डिलिव्हरी रिक्षा चालवताना दिसत आहेत.
रविवारीही बेझोस यांनी एक व्हिडिओ शेअर केला ज्यात ते कंपनीच्या डिलिव्हरी स्टेशनवर कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आहेत. तसेच बेझोस यांनी भारतीय ग्राहकांना एक खुले पत्र लिहिले असून त्यात त्यांनी भारतीय लोकांची अपार ऊर्जा आणि संयम त्यांना प्रेरणा देत असल्याचे म्हटले आहे.
Visit : bahujannama.com