पुणे : बहुजननामा ऑनलाईन – बर्ड फ्लूने (bird flu ) पोल्ट्री मार्केटची कंबर मोडली आहे. हिवाळा हा चिकन आणि अंडी विक्रेत्यांसाठी कमाईचा काळ असतो, परंतु यावेळी बर्ड फ्लूने त्यांच्या व्यावसायाला मोठा धक्का दिला आहे. देशातील 10 राज्यांमध्ये बर्ड फ्लू (bird flu ) आढळल्यानंतर चिकन आणि अंड्यांच्या किंमती दररोज वेगाने खाली जात आहेत. अनेक राज्यात चिकनची किंमत 60 रुपये किलोपेक्षा सुद्धा कमी झाली आहे. आतापर्यंत ज्या 10 राज्यांमध्ये केंद्र सरकारकडून बर्ड फ्लू पुष्टी झाली आहे ती आहेत – केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि दिल्ली.
पुण्यात एक अंडे आता 4.50 रुपये
मागील आठवड्यात बुधवारपासून देशाच्या अनेक भागात पक्षी मरण्याची वृत्त येत आहेत. तेव्हापासून आतापर्यंत पोल्ट्री मार्केटमध्ये गोंधळ उडाला आहे. महाराष्ट्रात चिकनची किंमत प्रति किलो 82 ते 58 रुपये प्रति किलोवर पोहचली आहे. गुजरातमध्ये 94 रुपये ते 65 रुपये आणि तमिळनाडुत 80 रुपये 70 रुपयांवर पोहचली आहे. या दरम्यान अंड्यांच्या किंमतीत सुद्धा मोठी घसरण झाली आहे. तमिळनाडुच्या नमक्कलमध्ये एका अंड्याची किंमत 5.10 रुपयावरून घसरून 4.20 रुपये झाली आहे. हरियाणाच्या बरवालामध्ये एका अंड्याची किंमत 5.35 रुपयांवरून खाली घसरून 4.05 रुपये झाली आहे. पुण्यात सुद्धा आता 4.50 रुपयात एक अंडे मिळत आहे.
शेतकर्यांचे मोठे नुकसान
पुण्याचे एक शेतकरी दीपक पवाले यांच्या संदर्भाने इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने म्हटले की, त्यांच्याकडे 40 हजार कोंबड्या आहेत, परंतु बर्ड फ्लूमुळे ते खर्चापेक्षा कमी किंमतीत चिकन विकत आहेत. त्यांनी म्हटले की, मला एक किलोसाठी सुमारे 74 रुपये खर्च करावे लागतात. कोरोनाच्या दरम्यान माझे सुमारे 30 लाखांचे नुकसान झाले. त्यावेळी चिकनची किंमत 10-15 रुपये प्रति किलोवर पोहचली होती. आमच्या व्यावसायात आता हळुहळु सुधारणा होत असताना, आता बर्ड फ्लूने त्रस्त केले आहे.
लागोपाठ कमी होत आहे विक्री
एका अंदाजानुसार, भारतात रोज सरासरी सुमारे 1.3 कोटी बॉयलर चिकन आणि 20 कोटी अंडी विकली जातात. हिवाळ्यात बिझनेस खुप वाढतो आणि रोज सरासरी 1.5 कोटी चिकन आणि सुमारे 28-29 कोटी अंडी विकली जातात. परंतु बर्ड फ्लूमुळे चिकनच्या विक्रीत 30-40 टक्के घसरण झाली आहे. पुढील काही दिवसात स्थिती आणखी खराब होऊ शकते, असे म्हटले जात आहे.