बहुजननामा ऑनलाइन टीम – बिहार निवडणुकीत नितीश कुमार (Nitish Kumar)यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने पुन्हा एकदा बहुमतासह सत्ता मिळवली आहे, परंतु जेडीयूला मोठा झटका बसला आहे. बिहारमध्ये नितीश कुमारांच्या एनडीएमध्ये एकीकडे छोटा भाऊ प्रमुख भूमिकेत आला आहे, तर नितीश सरकारच्या 10 मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. जेडीयू कोट्यातून 14 मंत्री निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, ज्यापैकी 6 विजयी होऊ शकले आणि 8 जणांना पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर भाजपच्या कोट्यातील 10 मंत्री निवडणूक लढले होते, ज्यापैकी 8 विजयी झाली आहेत आणि 2 पराभूत झाले.
नितीश सरकारच्या या 10 मंत्र्यांचा झाला पराभव –
1 दिनारा : सहकारमंत्री जय सिंह आरजेडीकडून पराभूत
2 जहानाबाद : शिक्षणमंत्री कृष्णनंदन प्रसाद वर्मा आरजेडीकडून पराभूत
3 जमालपूर : ग्रामविकासमंत्री शैलेश कुमार काँग्रेसकडून पराभूत
4 राजपूर : परिवहनमंत्री संतोष कुमार निराला काँग्रेसकडून पराभूत
5 हथुआ : राज्यमंत्री रामसेवक सिंह आरजेडीकडून पराभूत
6 सिंहश्रर : अनुसूचित जाती, जमाती कल्याणमंत्री रमेश ऋषिदेव आरजेडीकडून पराभूत
7 सिकटा : अल्पसंख्याक कल्याणमंत्री खुर्शीद ऊर्फ फिरोज अहमद सीपीआयकडून पराभूत
8 लौकहा : आपत्ती व्यवस्थापनमंत्री लक्ष्मेश्वर राय आरजेडीकडून पराभूत
9 मुजफ्फरपूर : नगरविकासमंत्री सुरेश कुमार शर्मा काँग्रेसकडून पराभूत
10 चैनपूर : भाजपचे खाण मंत्री बृज किशोर बिंद बसपकडून पराभूत
नितीश कुमारांचे 14 मंत्री विजयी
नालंदा : ग्रामविकासमंत्री श्रवण कुमार विजयी
सुपौल : ऊर्जामंत्री बिजेंद्र प्रसाद यादव विजयी
आलमनगर : मंत्री नरेंद्र नारायण यादव विजयी
रुपौली : ऊसमंत्री बीमा भारती विजयी
बहादुरपूर : अन्न पुरवठामंत्री मदन सहनी विजयी
कल्याणपूर : योजना आणि विकासमंत्री महेश्वर हजारी विजयी
पाटणा साहिब : रस्ते विकासमंत्री नंदकिशोर यादव विजयी
गया : कृषिमंत्री डॉ. प्रेम कुमार विजयी
बांका : भूमी सुधारणा महसूलमंत्री रामनारायण मंडल विजयी
लखीसराय : मनुष्य बळमंत्री विजय कुमार सिन्हा विजयी
मधुबन : सहकारमंत्री राणा रणधीर सिंह विजयी
मोतिहारी : कला सांस्कृतिकमंत्री प्रमोद कुमार विजयी
बेनीपट्टी : आरोग्य यंत्रणा मंत्री विनोध नारायण झा विजयी
बनमनखी : पर्यटनमंत्री कृष्ण कुमार ऋषी विजयी
सरायरंजन : विधानसभा अध्यक्ष विजय चौधरी विजयी