पटना : बहुजननामा ऑनलाइन – बिहार मध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान लालू प्रसाद यादवचे व्याही आणि काही दिवसांपूर्वी जेडीयू जॉईन करणारे बिहारचे पूर्व मंत्री चंद्रिका राय यांनी यादवांच्या मतांवरून मोठा दावा केला आहे. त्यांनी दावा केला आहे की या विधानसभा निवडणुकीमध्ये यादवांचं पूर्ण समर्थन आणि मतं लालू प्रसादच्या राजद आणि महाआघाडी ऐवजी जेडीयू आणि एनडीएला जाणार आहे.
चंद्रिका राय यांनी सोमवारी सीएम नितीश कुमारच्या वर्चुअल रॅलीचं समर्थन करत म्हटलं की, बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये यादवांचं पूर्ण समर्थन आणि मतं जेडीयू आणि एनडीएला मिळणार आहे. चंद्रिका रायने आपली मुलगी ऐश्वर्या राय तेजप्रताप यादव त्यांच्या विरोधात निवडणूक लढण्याचे संकेत दिले. चंद्रिका रायने समस्तीपुरच्या हसनपुर सीट वर तेजप्रताप यादवच्या दावेदारीवर बोलताना सांगितलं की आधी तेजप्रताप यादवला घोषणा तर करू द्या. जर ऐश्वर्या रायला निवडणूक लढवायची असेल तर ती नक्की लढणार.
चंद्रिका रायने जवळजवळ स्पष्ट केलं की तेजप्रताप यादवची पत्नी ऐश्वर्या राय त्याच्याच विरोधात बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये उभी राहू शकते. पण आता हे सर्व तेजप्रताप यादववर अवलंबून आहे. कारण अशी चर्चा आहे की ते यावेळेस माहुआ ऐवजी समस्तीपुर जिल्ह्यातील हसनपुर सीट वरून आपलं नशीब खुलवू शकतात. तेजप्रताप यादवने सीट बदलण्याच्या मुद्द्यावर आपले वडील लालू प्रसाद यादव यांची रांची येथे भेट घेतली होती.