बहुजननामा ऑनलाइन – देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) फिक्स्ड डिपॉजिट वरील व्याज दर कमी केल्याने पुन्हा एकदा ग्राहकांना धक्का बसला. एसबीआयने किरकोळ देशांतर्गत मुदत ठेवींवरील व्याज 1 ते 2 वर्षांच्या कालावधीत 0.20 टक्क्यांनी कमी केले आहे. म्हणजेच आता एसबीआयच्या एफडीवर मिळणारा फायदा कमी झाला आहे. नवीन व्याजदर 10 सप्टेंबर 2020 पासून लागू झाले आहेत. यापूर्वी एसबीआयने 27 मे रोजी मुदत ठेवींचे व्याज दर कमी केले होते. देशात पारंपारिक, सुरक्षित आणि निश्चित व्याज उत्पन्नासाठी मोठ्या प्रमाणात मुदत ठेव (एफडी) गुंतवणूक केली जाते.
एसबीआयच्या एफडीसाठी नवीन (10 सप्टेंबरपासून लागू) व्याज दर
– 7 ते 45 दिवस : नवीन व्याज दर 2.90 टक्के
– 46 ते 179 दिवस : नवीन व्याज दर 3.90 टक्के
– 180 ते 210 दिवस : नवीन व्याज दर 4.40 टक्के
– 211 दिवस ते 1 वर्षासाठी : नवीन व्याज दर 4.40 टक्के
– 1 ते 2 वर्षे : नवीन व्याज दर 4.90 टक्के
– 2 ते 3 वर्षे : नवीन व्याज दर 5.10 टक्के
– 3 ते 5 वर्षे : नवीन व्याज दर 5.30 टक्के
– 5 ते 10 वर्षे : नवीन व्याज दर 5.40 टक्के
एसबीआयचे ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडी व्याज दर :
– 7 ते 45 दिवस : नवीन व्याज दर 3.40 टक्के
– 46 ते 179 दिवस : नवीन व्याज दर 4.40 टक्के
– 180 ते 210 दिवस : नवीन व्याज दर 4.90 टक्के
– 211 दिवस ते 1 वर्षासाठी : नवीन व्याज दर 4.90 टक्के
– 1 ते 2 वर्षे : नवीन व्याज दर 5.40 टक्के
– 2 ते 3 वर्षे : नवीन व्याज दर 5.60 टक्के
– 3 ते 5 वर्षे : नवीन व्याज दर 5.80 टक्के
– 5 ते 10 वर्षे : नवीन व्याज दर 6.20 टक्के
यापूर्वी बँकेने एमसीएलआर-मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड आधारित कर्ज दर, कर्जाचा मुख्य दर या संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. एसबीआयने एमसीएलआर रीसेट वारंवारता 1 वर्षापासून सहा महिन्यांपर्यंत कमी केली आहे. घसरलेल्या व्याजदराचा फायदा घेण्यासाठी कर्जधारकांना वर्षासाठी प्रतीक्षा करावी लागत नाही. सध्या एसबीआयचा एक वर्षाचा एमसीएलआर 7 टक्के आणि सहा महिन्यांचा एमसीएलआर 6.95 टक्के आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी उत्पादन
याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेने एफडी उत्पादन ‘एसबीआय व्हेकेअर डिपॉझिट’ सुरू केले. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना किरकोळ मुदत ठेवींवर 5 वर्षांच्या मुदतीसाठी 30 बेसिस पॉईंटचा अतिरिक्त प्रीमियम मिळेल. एसबीआय व्हीकेयर डिपॉझिट योजना 31 डिसेंबर 2020 पर्यंत सुरू राहील.