नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही Paytm युज करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. पेटीएमने ग्राहकांना धक्का देऊन सेव्हिंग खात्यावरील व्याज कमी केले आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेने बचत खात्यावरील व्याज दर अर्ध्या टक्क्याने कमी करून ३.५ टक्के केला आहे. पेटीएम बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की ही कपात १ नोव्हेंबरपासून लागू होईल. याबरोबरच पेटीएम पेमेंट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी फिक्स्ड डिपॉझिट स्कीम (एफडी) ची देखील घोषणा केली आहे.
SBI ने देखील सेविंग अकाउंटवरील व्याजही कमी केले
अलीकडेच देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने सेविंग अकाउंट ठेवीवरील व्याज दर कमी केले आहेत. सेविंग अकाउंटवर १ लाख रुपयांपर्यंत ठेवी असणाऱ्यांना एसबीआय ३.२५% व्याज देईल. सेविंग अकाउंटमध्ये 1 लाख रुपयांपर्यंत ठेवी असणाऱ्यांना एसबीआय ३.२५ टक्के व्याज देईल. आता पेटीएम पेमेंट बँकेने देखील आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. ज्याचे पेटीएम पेमेंट बँकेत बचत खाते आहे अशा ग्राहकांवर याचा परिणाम होईल.
पेटीएम एफडीवर 7.5 टक्के व्याज देते
बँकेचे एमडी सतीशकुमार गुप्ता म्हणाले की रिझर्व्ह बँकेने नुकताच रेपो दर चतुर्थांश टक्क्याने घसरून ५.१५ टक्के केला आहे. गेल्या १२ महिन्यांत मध्यवर्ती बँकेने रेपो दरात १.३५ टक्के कपात केली. यामुळे, हे पाऊल उचलले गेले आहे. याशिवाय पेटीएम ग्राहकांना एक रुपयात एफडी खाते उघडण्याची संधी देते. पेटीएम एफडीवर ७.५ % व्याज देते. पेटीएम मध्ये बनवलेल्या एफडी मधून कोणतीही शुल्क न घेता अर्धवट किंवा पूर्ण रक्कम काढता येते.
Visit : bahujannama.com