पुणे : बहुजननामा ऑनलाईन – BIG Marathi Entertainment Awards | मराठी टेलिव्हिजन उद्योगातील सर्वोत्कृष्ट उत्सव साजरा करत, बिग एफ.एम ने बिग मराठी एन्टरटेन्मेंट अवॉर्ड्सच्या दुसऱ्या पर्वाचे भव्य पद्धतीने आयोजन केले. रेडिओ नेटवर्कने तब्बल 1.75 लाख मतांची नोंद केली. आर.जे बंड्याने होस्टची भूमिका निभावत प्रेक्षकांचे मनोरंजन केले . (BIG Marathi Entertainment Awards)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
10 श्रेणींमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यात काही मोठे विजय पहायला मिळाले. आपल्या जोशपूर्ण सादरीकरणाने (पॉवरहाऊस परफॉर्मन्सने) प्रेक्षकांच्या मनावर योग्य मोहोर उमटवत लोकप्रिय कलाकार विवेक सांगळे आणि मधुराणी गोखले यांनी अनुक्रमे बिग सर्वोत्कृष्ट पात्र पुरुष आणि स्त्री (बेस्ट कॅरेक्टर मेल आणि फिमेल) चा पुरस्कार पटकावला. कलाकार ओंकार गोवर्धन आणि निवेदिता सराफ यांनी बिग सहाय्यक पात्र (पुरुष आणि स्त्री) ची (सपोर्टिंग कॅरेक्टर मेल आणि फिमेलची) ट्रॉफी जिंकली. आपल्या सुरांनी प्रेक्षकांना मुग्ध करत योगयोगेश्वर जय शंकर नी बिग (सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत) बेस्ट टायटल साँग जिंकले. बिग सर्वोत्कृष्ट कुटुंब (बेस्ट फॅमिली) गटात अनेक जणांचे मन जिंकणारी कुलकर्णी फॅमिली जिंकली. ऋषिकेश शेलार आणि माधवी कुलकर्णी यांना बिग सर्वोत्कृष्ट खलनायक चा (बेस्ट व्हिलनचा) पुरस्कार मिळाला. बिग सर्वोत्कृष्ट (बेस्ट) जोडीच्या गटात चेतन वडनेरे आणि ज्ञानदा रामतिर्थकर यांनी आपल्या शानदार ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने बाजी मारली. महाराष्ट्राची हास्यजत्राला बिग सर्वोत्कृष्ट (बेस्ट) नॉन-फिक्शन शोच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उत्कृष्ट अभिनय करत अभिनेते प्रशांत दामले यांना ‘नाटक विशेष पुरस्कार (ड्रामा स्पेशल अवॉर्ड)’ मिळाला. बहुगुणी, अवधूत गुप्ते यांना ‘बिग वर्षाचा सर्वात प्रतिभावान कलाकार (मोस्ट टॅलेंटेड आर्टिस्ट ऑफ द इयर)’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अष्टपैलू भूमिका साकारणारा अभिनेता म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सिद्धार्थ जाधवला ‘बिग दमदार अष्टपैलू अभिनेत्याचा पुरस्कार (पॉवरफुल व्हर्सटाइल अॅक्टर ऑफ द इयर)’ हा पुरस्कार मिळाला आणि आपल्या कसदार भूमिकांनी प्रेक्षकांचे मन आकर्षित करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने ‘बिग वर्षाचा प्रभावी कलाकार (इम्पॅक्टफुल परफॉर्मर ऑफ द इयर)’ हा किताब पटकावला. (BIG Marathi Entertainment Awards)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या पुरस्कारांविषयी बोलताना बिग एफ.एम चे सी.ओ.ओ सुनील कुमारन म्हणाले की, “यावर्षी प्रथमच बिग मराठी एन्टरटेन्मेंट अवॉर्ड्सचे वास्तविकरित्या (ऑन-ग्राउंड) आयोजन करताना आम्ही खूप खुश आहोत.
या अविश्वसनीय प्रतिभेनी त्यांच्या अफलातून अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे आणि म्हणूनच
त्यांचा व्यक्तिशः सत्कार करताना आम्हाला खरोखर आनंद होत आहे.
त्यांच्या आवडत्या कलाकारांना मत देणाऱ्या श्रोत्यांकडून आम्हाला मिळालेला सहभाग नेत्रदीपक आहे आणि
व्यासपीठ मिळवू शकलेल्या सहभागाचा खरा पुरावा म्हणून उभा आहे.
आम्ही विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि अनेक काळासाठी (वर्षे) त्यांना भेटत राहण्याची आशा करतो.”
आर.जे बंड्या यांनी सांगितले की, “पहिल्यांदाच हा शो वास्तविक रूपात (ऑन-ग्राऊंड) होस्ट करण्याची
आणि विजेत्यांसोबत साजरा करताना सहभागी घेण्याची संधी मिळाल्याने मला आनंद आहे.
आमच्या श्रोत्यांनी आम्हाला भरभरून दिलेला प्रतिसाद आणि त्यांनी आपल्या आवडत्या कलाकारांचे केलेले
कौतुक पाहून मी अतिशय खुश आहे. सर्व विजेत्यांचे आणि नामांकन मिळालेल्या व्यक्तींचे खूप खूप अभिनंदन
आणि हा कार्यक्रम पूर्ण यशस्वी केल्याबद्दल प्रेक्षकांचे अनेक आभार.”
बिग मराठी एन्टरटेन्मेंट अवॉर्ड्समध्ये (BIG Marathi Entertainment Awards) विविध श्रेणींमधील सर्वोत्कृष्ट
प्रतिभावंतांनी एकत्र येऊन मराठी टेलिव्हिजन उद्योगातील कलात्मक तेजाची हुशारीची संध्याकाळ साजरी केली.
एअरवर, डिजिटल आणि बिग एफ.एम च्या सर्व प्लॅटफॉर्मवर या पुरस्कारांची मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात
आली होती. झी 24 तासवर हे पुरस्कार जानेवारी 2023 मध्ये प्रसारित केले जातील.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- BIG Marathi Entertainment Awards | Madhurani Gokhale and Vivek Sangle take home the ‘BIG Best Character’ trophy at the second-edition of BIG FM’s ‘BIG Marathi Entertainment Awards’!
हे देखील वाचा :
Gulabrao Patil | संजय राऊत काय मेंदूचे डॉक्टर आहेत का?, गुलाबराव पाटलांचे टीकास्त्र
Bigg Boss 16 | या आठवड्यात अब्दू रोजीकला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागणार; नक्की काय घडले ?