बहुजनननामा ऑनलाईन – देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे छोटीशी तक्रार केल्याची बातमी समोर आली आहे. गृहमंत्री अमित शहा रविवारी नायडू यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला पोहचले होते त्यावेळी त्यांनी तक्रार केली. नायडू यांनी आतापर्यंत उपराष्ट्रपतीपदाच्या दोन वर्षांच्या कार्यकाळानुसार त्यांच्या ‘लिस्निंग, लर्निंग एंड लीडिंग’या पुस्तकाचे प्रकाशनाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी गृहमंत्री अमित शहा तेथे उपस्थित होते. त्याचदरम्यान अमित शाह यांनी उप राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे केलेल्या तक्रारीबद्दल बोलले. या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत सुद्धा उपस्थित होते.
अमित शहा म्हणाले की, व्यंकय्या नायडू यांच्याकडे माझी छोटीशी तक्रार आहे. शाह पुढे म्हणाले की, ते सत्ताधारी पक्षाच्या लोकांशी अधिक काटेकोरपणे वागतात. त्यामुळे राज्यसभेत प्रत्येक मंत्री त्यांना घाबरतात.