नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसनेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे. तसेच ते आजचा भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. आज माधवराव शिंदे यांची जयंती असून या निमित्ताने ते मोठे पाऊल टाकू शकतात. आत्ता त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून कालपासूनच याबाबत चर्चा चालली होती. ज्योतिरादित्य शिंदे यांना मानणारा आमदारांचा मोठा गट सध्या बंगळुरूमध्ये असून त्यांची संख्या १७-१८ च्या आसपास आहे. हा पूर्ण गट भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.
Congress leader Jyotiraditya Scindia tenders resignation to Congress President Sonia Gandhi pic.twitter.com/GcDKu3BLw8
— ANI (@ANI) March 10, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात आज तासभर चर्चा झाली असून ज्योतिरादित्य भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत होते. ज्योतिरादित्य यांना राज्यसभेवर पाठवले जाणार असून त्यानंतर त्यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाईल अशी माहिती मिळत आहे. तसेच त्यांच्या मदतीने मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांचे भाजपमधील सरकार पुन्हा स्थापित होईल.
मागच्या दीड वर्षांपासून त्यांना राज्याच्या नेतृत्वात ज्या पद्धतीने वागणूक मिळत होती त्यात ज्योतिरादित्य यांना मोकळ श्वास घेता येत नव्हता. त्यांनी अनेकदा आपली नाराजी उघड करण्याचाही प्रयत्न केला आहे. तसेच त्यांनी आपल्या ट्विटर बायोमधून काँग्रेस हा शब्दही हटवत क्रिकेटप्रेमी शब्द ठेवला होता. या सगळ्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल खात्री झाली होती.