मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथकाने दोन जणांना अटक केली असून या दोघांकडे तब्बल सात किलो युरोनियम आढळून आले. अणुबॉम्ब बनवण्यासाठी लागणारे युरेनियम जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. एटीएसने जप्त केलेल्या युरेनियमची किंमत 21 कोटी असल्याचे सांगितले जात आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे हा घातक पदार्थ कोठून आला, कोणी दिला, याचा वापर कशासाठी केला जाणार होता ? याचा तपास सुरु आहे. या दोघांनी हा घातक पदार्थ प्रयोगशाळेतील व्यक्तींच्या मदतीनेच आणला असण्याची शक्यता आहे. दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष भालेकर आणि त्यांच्या पथकाने केली.
Maharashtra | Two people were arrested in connection with illegal possession of Natural Uranium in Nagpada area of Mumbai, yesterday. Police seized about 7 kg 100 grams of Natural Uranium worth Rs 21.30 crores. Case has been registered under Atomic Energy Act, 1962.
— ANI (@ANI) May 6, 2021