Bhor Assembly Election 2024 | भोर मतदार संघातील भाजपचे बंडखोर नगरसेवक किरण दगडे यांची पक्षातून हकालपट्टी – भाजप नेते प्रवीण दरेकर

November 6, 2024

पुणे – Bhor Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या ४० जणांची भाजपने पक्षातूनच हकालपट्टी केली आहे. सर्वच बंडखोरांची हकालपट्टी केल्याचे स्पष्ट करताना भोर मधील भजपचे बंडखोर नगरसेवक किरण दगडे (Kiran Dagade) यांची देखील हकालपट्टी केल्याचे भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

महायुतीमध्ये (Mahayuti Candidate) भोर मतदार संघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. येथून शंकर मांडेकर (Shankar Mandekar) हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. परंतु भाजपचे किरण दगडे आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांनी या मतदार संघात बंडखोरी केली आहे. आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेवून ते प्रचार देखील करत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत. 

 दरम्यान प्रदेश भाजपने आज बंडखोरी करणाऱ्या चाळीस जणांची पक्षातूनच हकालपट्टी केली आहे. मात्र यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या यादीत भोर मतदार संघातील उमेदवार किरण दगडे यांच्या नावाचा उल्लेख नाही. यामुळे राष्ट्रवादी चे कार्यकर्ते तक्रार करत आहेत. याबाबत पुण्यात पत्रकार परिषदेसाठी आलेले भाजप नेते प्रवीण दरेकर यांना विचारणा केली असता ते म्हणाले आमच्या पक्षाने सर्वच बंडखोरांची हकालपट्टी केली आहे, त्यामध्ये किरण दगडे देखील येतात. राज्यात पुन्हा सत्ता आणण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते अधिकृत उमेदवारांचा प्रचार करत आहेत.