भोपाल : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमधील राजकीय घटनाक्रम सतत बदलत असून आता ताजी आणि मोठी बातमी येत आहे. काँग्रेसचच्या १९ आमदारांचे राजीनामे राजभवन आणि सभापतींकडे पोहोचले असून सगळ्या शिंदे छावणीतील १९ आमदारांचे राजीनामे आत्ता बंगळुरूमध्ये आहेत. राजभवनाच्या ईमेलवर आमदारांनी आपले राजीनामे पाठवले आहेत.
दिग्वीजय यांनी केले मोठे विधान –
मंत्री आणि आमदार भोपाळमधील सीएम हाऊसमध्ये पुन्हा दाखल झाले असून तेथे पोहोचण्यापूर्वी दिग्विजय सिंह यांनी विधानसभेत मध्य प्रदेशातील माफियाविरोधात कारवाई करण्यात आल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. शिंदे कॉंग्रेसकडे राहणार की नाही हे तेच सांगतील.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक
दरम्यान भोपाळमधील सीएम हाऊस येथे बैठक आयोजित केली असून दिग्विजय सिंह यांच्यासह सुमारे एक डझन मंत्री यात सामील होणार आहेत. मंत्री सज्जनसिंह वर्मा, लखनसिंग यादव, बाळा बच्चन, सुरेंद्रसिंह बघेल, तरुण भनोट यांच्यासह डझन मंत्री या बैठकीस उपस्थित असताना दिल्लीत शिंदे यांनी मोदींची भेट घेतल्यानंतर ते सीएम कमलनाथ यांच्या मंत्र्यांसह बैठक घेणार आहेत. दरम्यान सीएम कमलनाथ यांची सोनिया गांधी यांच्याशी फोनवर चर्चा झाली आहे.
सिलावटचा फोन बंद ट्विटर चालू
कालपासून शिंदे समर्थक मंत्री आणि आमदारांचे फोन बंद असून शिंदे समर्थक आरोग्यमंत्री तुलसी सिलावट यांनी ट्विटरवर होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण तुमच्या जीवनात आनंद, प्रगती आणि समृद्धीचे रंग भरेल, असे त्यांनी लिहिले आहे.