वृत्तसंस्था – मध्यप्रदेश राज्यात ऑनलाइन फ्रॉड करणारे लोकांनी आता नवीन फंडा वापरात आणल्याचे समोर आले आहे. अगोदर ओटीपी पाठवून लोकांची फसवणूक करणारे हेच ऑनलाईन फ्रॉड करणारे आता नव्या मार्गाने लोकांना ब्लॅकमेल करत असल्याचे आढळून आले आहे. याबाबत भोपाळहून ताजे प्रकरण समोर आले आहे. जेथे फसवणूक करणार्यांच्या तावडीत अडकलेल्या एका व्यक्तीने सायबर क्राइमकडे तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पीडित व्यक्तीने सांगितले की, आरोपीने व्हिडिओ कॉलवरून नग्न मुलीशी बोलून त्या व्यक्तीचा स्क्रीन शॉट घेतला होता. आता हे ऑनलाईन फ्रॉड करणारे सोशल मीडियावर तो स्क्रीन शॉट व्हायरल करण्याची धमकी देत आहेत. तसेच यावरून ब्लॅकमेल करीत आहेत.
असे अडकले ‘त्या’ जाळ्यात :
पीडित व्यक्तीने सायबर पोलिसांना सांगितले की, मुलीने काही दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉल केला होता. हा व्हिडिओ कॉल केल्यावर मुलगी नग्न अवस्थेत स्क्रीनवर दिसली होती. त्यानंतर बोलणे सुरू झाले, यावेळी त्या मुलीने स्क्रीन शॉट घेतला. यात पीडित व्यक्तीचा फोटो मुलीसोबत दिसत आहे. व्हिडिओ कॉल संपल्यानंतर ते आरोपी सतत ब्लॅकमेल करत आहेत. तसेच पीडित व्यक्तीने सांगितले की, आरोपींनी यापूर्वी काही हजार रुपये मागितले होते, परंतु आता ते अधिक पैशाची मागणी करत आहेत. पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी व्हिडिओ कॉल करणार्याचा नंबर शोधण्याचे काम करत आहेत.
अज्ञात व्हिडिओ कॉल घेऊ नका : सायबरचा सल्ला
या संपूर्ण प्रकरणात एएसपी सायबर अंकित जयस्वाल यांनी असे सांगितले की, लोकांनी अज्ञात व्हिडिओ कॉल घेऊ नये, असा सल्ला दिला आहे. अज्ञात क्रमांकावरून आलेला व्हिडीओ कॉल तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतो, असे प्रकार समोर आले आहेत. तसेच यात सायबर गुन्हेगार प्रथम अज्ञात क्रमांकावरून व्हिडिओ कॉल करतात, ज्या नंबरवरुन कॉल येतो, त्यासमोर नग्न स्त्री/महिला उपस्थित केली जाते आणि कॉल रिसिव्ह होताच स्क्रिनशॉट काढला जातो. आणि सुरू होतो ब्लॅकमेलचा प्रवास. त्यामुळे अज्ञात नंबरवरून आलेला व्हिडिओ कॉल घेणे टाळावे.
व्हिडिओ कॉल टाळण्यासाठी हे करावे :
1. सायबर तज्ञाचा असा सल्ला आहे की, जेव्हा आपणास फोनवर अज्ञात व्हिडिओ कॉल येतो, तेव्हा त्यास गुंतवून ठेवू नका.
2. किंवा जेव्हा व्हिडीओ कॉल आला तर मोबाईलच्या पुढील कॅमेर्यावर बोट ठेवून होणारे व्हिडीओ रेकॉडींग थांबवा किंवा आरोपींना स्क्रीन शॉट घेता येणार नाही, असे करा.