बहुजननामा ऑनलाईन टीम : ‘बुलाती है मगर जाने का नही’ या गाण्यात राष्टपिता महात्मा गांधीजीचे नाव घेणे एका भोजपुरी गायिकेला महागात पडले आहे. झारखंडची राजधानी रांची येथे झालेल्या एका कार्यक्रमात गाण्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाचा वापर केल्याचा आरोप भोजपुरी गायिका अंतरा सिंह प्रियांकावर आहे.
याप्रकरणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. छोटा नागपूर खादी ग्राम उद्योगाने पोलिसांकडे तक्रार केली आहे. अंतरा सिंह प्रियांकाने गायलेले हे गाणे अश्लील नसून त्यात गांधीजींच्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याची तक्रार त्यांनी केली. प्रियांकाने देशाच्या महापुरुषाचा अपमान केल्याचे तक्रार कर्त्यांनी म्हटले आहे. भोजपुरी इंडस्ट्रीत प्रियांका चांगलीच प्रसिद्ध आहे. बहुतांश हिट भोजपुरी गाणी तिनेच गायली आहेत.
आता या तक्रारीनंतर ती अडचणीत सापडली आहे. मागील काही दिवसांत ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ हे गाणं चांगलंच गाजले आहे. या गाण्यामुळे प्रियांका फार चर्चेत होती. उर्दूमधील प्रसिदध शायर राहत इंदौरी यांचा शेर ‘बुलाती हैं मगर जाने का नहीं’चं साँग व्हर्जन सगळीकडे खूप व्हायरल झाले आहे. या शायरीवर भोजपुरी गायिकांनी गाणे गायले होते.