बहुजननामा ऑनलाइन – Bhaskar Jadhav | महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीमुळे सध्या सर्वांचेच लक्ष शिवसेनेकडे लागून राहिले आहे. अशातच जर पक्षातील एखादा आमदार किंवा नेता दिसेनासा झाला तर तो चर्चेचा विषय ठरत आहे. असेच काही से भास्कर जाधवांबद्दल (Bhaskar Jadhav) देखील झाले. राज्यात सुरू असलेल्या सत्ता नाटकात जाधव कुठेच न दिसल्याने त्यांच्या मनात नेमके आहे तरी काय ? अशी चर्चा रंगली होती परंतू त्यांनी स्वत: माध्यमांसमोर येऊन मी नॉट रिचेबल नसल्याचे सांगून चर्चेला पूर्णविराम दिला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी माध्यमांसमोर सांगितले की, “भावावर शस्त्रक्रिया झाली असल्याने मी गावी चिपळूणला आलो आहे. याची कल्पना मी पूर्वीच वरिष्ठ नेत्यांना दिली आहे. त्यामुळे मी संपर्काबाहेर असल्याच्या निव्वळ अफवा पसरविल्या जात आहेत. काहीही सांगितले जात आहे.” असे सांगत जाधव यांनी संताप ही व्यक्त केला.
राज्यात काय आहे सध्याची परिस्थिती –
महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार राज्यात बहुमत सिध्द करेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केला आहे. तर दुसरीकडे शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात आता कायदेशीर लढाई सुरू झाल्याचे दिसत आहे. शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेत आपल्याकडे दोन तृतीयांश शिवसेना आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. शिवसेनाने बऱ्याच आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्याकडे केली आहे.
Web Title :- Bhaskar Jadhav | shivsena bhaskar jadhav says i am reachable chiplun eknath shinde maharashtra political crisis
हे देखील वाचा :