रत्नागिरी : बहुजननामा ऑनलाइन – कुडाळ येथील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांच्या समर्थनात निघालेलेल्या मोर्चात आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केलेले भाषण वादग्रस्त ठरले आहे. त्यानंतर मंगळवारी (दि.18) मध्यरात्री जाधवांच्या घरावर हल्ला देखील झाला. त्यानंतर भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी प्रथमच माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्य सरकारने अचानकपणे माझे संरक्षण काढले. मी गेल्या चाळीस वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत संरक्षण (Protection) घेतले नाही. मी कधीच संरक्षण मागितले नाही. मी जे काही राजकारण करतो, ते माझा व्यवसाय करुन करत असतो. मागील सरकारमधील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मला संरक्षण दिले होते. माझ्या मुंबईच्या आणि चिपळूणच्या निवासस्थानी मला संरक्षण देण्यात आले होते. काल रात्री अचानक घराजवळील संरक्षण काढले गेले. माझ्या घराजवळील सर्व पोलीस गैरहजर होते. त्यामुळे ते नसताना हा भ्याड हल्ला झाल्याचे जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून असे काही होईल,
असा मी विचार देखील केला नव्हता, असे म्हणत जाधवांनी फडणवीसांना या हल्ल्यामागे जबाबदार धरले आहे.
मी देवेंद्र फडणवीसांना सुसंस्कृत राजकारणी मानतो. ते पोलीस खात्याचे प्रमुख आहेत.
त्यामुळे माझे संरक्षण काढण्याचे आदेश त्यांनीच दिले असावेत, असे मला वाटते, असे जाधव म्हणाले.
तसेच ईडी (ED), सीबीआय (CBI), प्राप्तीकर आणि पोलिसांच्या धाडी टाकून,
पक्ष फोडून तुमचे समाधान झाले नाही म्हणून आता तुम्ही आमच्यासारखी बोलणारी,
प्रतिकार करणारी माणसे मारणार असाल, तर निश्चितपणे आम्हाला मारा, आम्ही मागे हटणार नाही,
असे भास्कर जाधव म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Bhaskar Jadhav | Bhaskar Jadhav to media for first time after home attack; Serious allegations made against Devendra Fadnavis
हे देखील वाचा :
Vinayak Raut | शिवसैनिकांवरील हल्ल्याला आंदोलनाने उत्तर देऊ, खा. विनायक राऊत यांचा इशारा
High Blood Pressure | ब्लड प्रेशर कंट्रोल करू शकते का सैंधव मीठ? जाणून घ्या आणखी घरगुती उपाय