मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Bharti Jaffrey Passed Away | कॉमेडियन किंग राजू श्रीवास्तव (Comedian King Raju Srivastava) यांचे निधन झाले. ह्या धक्क्यातून सावरत असताना आता बॉलिवूडमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेते अशोक कुमार (Ashok Kumar) यांची मुलगी अभिनेत्री भारती जाफरी (Bharti Jaffrey) यांचे निधन (Pass Away) झाले आहे. दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले आहे. भारती जाफरी यांच्यावर मुंबईच्या चेंबूर येथे अंतिम संस्कार करण्यात आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आणि भारती यांचे पती कंवलजीत सिंह (Kanwaljit Singh) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भारतीच्या निधनाची माहिती दिली.
यासोबत त्यांनी भारतीचा एक फोटो शेअर केला आहे. आमची प्रेमळ, भारती जाफरी, मुलगी, बहिण, पत्नी, आई,
ताई, काकू, शेजारी, मैत्रीण आणि आमची प्रेरणा 20 सप्टेंबरला आम्हाला सोडून गेली, अशी भावूक पोस्ट त्यांनी यावेळी केली.
भारती जाफरी यांची बॉलिवूडमधील कारकीर्द खूप कमी होती.
मात्र त्यांनी आपल्या या छोटेखानी कारकिर्दीत हजार चौरासी की मां, सास, दमन आणि देवी अहिल्या बाई सारख्या
सिनेमात अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
Web Title :- Bharti Jaffrey Passed Away | ashok kumar daughter bharti jaffrey passed away
हे देखील वाचा :
Shivsena Uddhav Thackeray Mission BMC | ‘मिशन बीएमसी’साठी शिवसेनेने आखली खास रणनीती
Kidney Stone | नवजीवन ॲग्रो अँड फार्माचे मुतखड्यावर खात्रीशीर रामबाण उपाय ‘नवजीवन स्मॅशस्टोन’