भंडारा अग्निकांड प्रकरणात 2 परिचारिकांवर सदोष मनुष्यवधाचा FIR दाखल

भंडारा : बहुजननामा ऑनलाईन – जिल्हा सामान्य रुग्णालयातील १० बालकांच्या मृत्यु प्रकरणी २ परिचारिकांवर भंडारा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात तब्बल ४० दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही परिचारिकांनी अटकपूर्व जामीनासाठी भंडारा जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर २२ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
शुभांगी साठवणे आणि स्मीता आंबिलढुके असे गुन्हा दाखल झालेल्या परिचारिकांची नावे आहेत. याप्रकरणी साकोलीचे उपविभागीय अधिकारी अरुण वायकर यांनी गुरुवारी रात्री फिर्याद दिली आहे.
भंडारा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीच्या पहाटे लागलेल्या आगीत १० बालकांचा जळून मृत्यु झाला होता. याप्रकरणाची उच्च स्तरीय चौकशीही करण्यात आली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांसह ७ जणांवर कारवाई करण्यात आली होती. आता गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी मेसेज करुन दिली.
Comments are closed.