नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑनलाइन चॅटिंगबाबत गृह मंत्रालयाकडून एक सल्ला जारी करण्यात आला आहे. हा सल्ला सायबर दोस्तने एका ट्विटमध्ये दिला आहे. सायबर दोस्त गृह मंत्रालयाकडून चालवले जाणारे ट्विटर हँडल आहे, जे सायबर क्राइम आणि सायबर सुरक्षेबाबत सामान्य जनतेला सावध करते.
ऑनलाइन चॅटिंगबाबत ‘सायबर दोस्त’ने जे ट्विट केले आहे, त्यामध्ये म्हटले आहे की, ऑनलाइन चॅटिंग प्लॅटफार्मवर अनोळखी व्यक्तीशी चॅट करताना सतर्क राहा. ते वाईट हेतूने लिंक पाठवू शकतात किंवा सिस्टम हॅक करण्याचा प्रयत्न करू शकतात. कोणत्याही अनोळखी लिंकवर किंवा यूआरएलवर क्लिक करू नका जी कोणत्याही कारणामुळे संशयास्पद वाटेल आणि मोठी सूट/ कॅशबॅकच्या ऑफरने जाळयात फसवेल.
काय आहे सल्ला
गृह मंत्रालयाने व्हॅलेंटाइन डे निमित्त फसवणुकीबाबत लोकांना सावध केले आहे. ‘सायबर दोस्त’ने म्हटले आहे की, सायबर गुन्हेगार तुम्हाला व्हॅलेंटाइन डेनिमित्त पुरस्कार जसे की प्रश्नत्तोरे/भाग्यशाली विजेता इत्यादी प्राप्त करण्यासाठी आमंत्रित करू शकतात किंवा स्टार हॉटेलमध्ये सूट मिळवण्यासाठी बनावट लिंक पाठवू शकतात.
व्हॅलेंटाइनच्या नावाने फसवणूक
यात म्हटले आहे की, बनावट व्यापारी /वेबसाइट व्हॅलेंटाइन डे च्या थीमवर भेटवस्तूचे व्हाऊचर, चॉकलेट्स, गुलाब पुष्प, ज्वेलरी इत्यादीसारख्या व्यवहारांवर मोठी सूट देऊ शकतात. अशा वाईट हेतूने पाठवलेल्या लिंकवर, क्लिक करू नका. कारण क्लिक केल्यास तुमच्या उपकरणात मालवेयर इंस्टॉल केला जाऊ शकतो. किंवा तुम्हाला बनावट वेबसाइटवर नेले जाऊ शकते. याशिवाय ऑनलाइन काहीही खरेदी करण्यापूर्वी व्यवहाराची सत्यता पडताळून पहा.
अशा व्हिडिओ कॉलपासून सावध
गृह मंत्रालयाकडून व्हिडिओ कॉलबाबत सुद्धा सल्ला देण्यात आला आहे. यात म्हटले आहे…
– कोणत्याही अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल स्वीकारू नका.
– व्हिडिओ कॉलदरम्यान कोणतीही अनोळखी व्यक्ती किंवा मित्राद्वारे करण्यात आलेली कोणतीही अनैतिक/वाईट विनंती स्वीकारणे टाळा.
– सायबर फसवणूक करणार्यांकडून व्हिडिओ सत्राच्या स्क्रीन रेकॉर्डिंगचा दुरुपयोग ब्लॅकमेल किंवा धमकीच्या उद्देशाने केला जाऊ शकतो.
– अशाप्रकारच्या फसवणुकीच्या प्रकरणात, तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू शकता किंवा सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टल www.cybercrime.gov.in वर ऑनलाइन तक्रार दाखल करू शकता.