बहुजननामा ऑनलाईन टीम : आर्थिक वर्षाच्या सुरवातीला आपल्या पगारात वाढ व्हावी, अशी प्रत्येकाचं इच्छा असते , पण काही जणांच्या या अपेक्षा या अपेक्षाच बनून राहतात. मात्र, अमेरिकेतील डॅन प्राईसने आपल्या कंपनीतील कामगारांच्या पगारात मात्र छप्प्पर फाडकर वाढ केली आहे. ती सर्वांच्याच अपेक्षेपेक्षा जास्त आहे. या कंपनीतील कामगारांच्या पगाराचा आकडा एकटाच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकेल.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील Idaho मध्ये ‘ग्रॅव्हिटी पेमेंट्स’ नावाची एक कंपनी आहे. डॅन प्राईस हे या कंपनीचे सीईओ आहेत. डॅन यांनी आपल्या कामगारांच्या पगारात १० हजार डॉलर म्हणजे तब्बल ७,१०,६२२ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या कंपनीतील सर्वात कमी पगार असलेला कामगार देखील वर्षाला २८,४२,४८८ रुपये कमावतो. एवढेच नाही तर, येत्या ५ वर्षात कामगारांच्या पगारात ४९,७४,२५४ रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याची माहिती डॅन यांनी दिली आहे. डॅन यांची कंपनी क्रेडिट कार्ड प्रोसेसिंग मध्ये कार्यरत आहे. या कंपनीने नुकतेच chargelt pro नावाची कंपनी विकत घेतली आहे. त्यासाठी नवीन ऑफिस आणि नवीन कर्मचारीदेखील घोषित केले आहेत.
दरम्यान २०१५ मध्ये डॅन यांनी आपल्या पगारात ८० ते ९० टक्के कपात करून आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात ७० हजार डॉलर ची घोषणा केली होती. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले कि, ‘मी समस्यांचा भागीदार होऊ शकलो नाही, परंतु मला समाधानच भागीदार व्हायला आवडेल, आधी मी दरवर्षी १ मिलियन डॉलरची कमाई करायचो आणि माझे कर्मचारी ३० हजार डॉलरची कमाई करायचे.’ अर्थातच या पगार वाढीमुळे डॅन च्या कंपनीतील कर्मचाऱ्यांचा आनंदाला तोडच नसेल.
This morning we cut the ribbon on the new @GravityPymts Boise office AND announced that all of our employees here will start earning our $70k min salary.
I’m so grateful to work with this amazing team and to be able to compensate them for the value they bring to our community. pic.twitter.com/stwwJgYCqQ
— Dan Price (@DanPriceSeattle) September 23, 2019
Visit : bahujannama.com