नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या व्यासपीठावरून, पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणार्या मुलीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवारी बेंगळुरू येथे आयोजित एआयएमआयएमच्या रॅलीत अमुल्या लिओना नावाच्या मुलीने ओवैसीच्या उपस्थितीत पाकिस्तान जिंदाबादचा जयघोष केला. या काळात मुलीने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरी रजिस्टर (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) च्या विरोधात घोषणाही दिल्या होत्या. त्याच्याविरोधात पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. अमूल्याला परप्पाना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, मुलीने स्टेजवरुन पाकिस्तान समर्थक घोषणा दिल्या असता, असदुद्दीन ओवैसी यांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
या संपूर्ण प्रकरणात, अमूल्या लिओनाच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले कि, सीएएविरोधी रॅलीत मुलीचे वर्तन पूर्णपणे चुकीचे होते. हे कृत्य सहन करणे योग्य नाही. ते म्हणाले की मी अनेकदा मुलीला या चळवळीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता पण तिने माझे ऐकले नाही. अमूल्य लिओनचे वडील पुढे म्हणाले की, मी हार्ट पेशंट आहे. काल ती माझ्याशी बोलली आणि माझ्या तब्येतीबद्दल विचारले. त्यानंतर तिचे आणि माझे कोणतेही बोलणे नाही.
#WATCH The full clip of the incident where a woman named Amulya at an anti-CAA-NRC rally in Bengaluru raised slogan of 'Pakistan zindabad' today. AIMIM Chief Asaddudin Owaisi present at rally stopped the woman from raising the slogan; He has condemned the incident. pic.twitter.com/wvzFIfbnAJ
— ANI (@ANI) February 20, 2020
ओवेसी म्हणाले- ही विचित्र कृती
त्याच वेळी ओवेसी म्हणाले, ‘मी नमाज पठण करण्यासाठी जात होतो. तेव्हा मी ह्या विचित्र घोषणा ऐकल्या. मी स्वतः येऊन तिला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्या मुलीला तिथून बाहेर काढले. मी या प्रकरणाचा निषेध करतो. ओवेसी म्हणाले, ‘हे लोक वेडे आहेत आणि या लोकांना देशावर प्रेम नाही. या प्रकारची कृती कधीही सहन केली जाऊ शकत नाही.