बहुजननामा ऑनलाइन टीम – बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने तयार केलेल्या कोरोना व्हायरस महामारीवरील कोव्हॅक्सीनच्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षेला आजपासून हरियाणा येथे सुरुवात झाली. दरम्यान, हरियाणाचे गृह तसेच आरोग्य मंत्री अनिल वीज यांनी कोव्हॅक्सीनच्या परीक्षणात व्हाॅलंटिअर म्हणून स्वतः लस टोचून घेतली आहे. आरोग्यमंत्री अनिल विज (Minister Anil Vij)यांनी यापूर्वीच आपण कोव्हॅक्सीनच्या परीक्षणातील व्हाॅलंटिअर म्हणून डॉक्टरांच्या देखरेखीत सर्वप्रथम लस टोचून घेऊ, असे जाहीर केले होते.
पहिल्या आणि दुसर्या टप्प्यावरील लशीचे परीक्षण पूर्ण
या लसीच्या तिसऱ्या टप्प्यावरील चाचणी भारतातील एकूण २५ केंद्रांवर २६ हजार लोकांवर करण्यात येणार आहे. कोरोना लसीसाठी भारतात आयोजित करण्यात आलेली ही सर्वात मोठी मानवी क्लिनिकल ट्रायल आहे. लशीच्या पहिल्या आणि दुसर्या टप्प्यावर परीक्षण आणि विश्लेषण यशस्वी ठरलं आहे. आता तिसऱ्या टप्प्यावर परीक्षण सुरू करण्यात आलं आहे. मानवी चाचणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात जवळपास एक हजार व्हाॅलंटिअर्सना ही लस देण्यात आली होती.
Haryana Health Minister Anil Vij being administered a trial dose of #Covaxin, at a hospital in Ambala.
He had offered to be the first volunteer for the third phase trial of Covaxin, which started in the state today. pic.twitter.com/XDLy6et5uM
— ANI (@ANI) November 20, 2020
या परीक्षणात भाग घेणाऱ्या लोकांचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. परीक्षण काळात व्हाॅलंटिअर्सना साधारणपणे २८ दिवसांच्या आत दोन इंटामस्कयुलर इंजेक्शन दिले जातील. मल्टी सेंटर थर्ड फेस ट्रायल भारतात एकूण २२ ठिकाणी होईल. परीक्षण काळात व्हाॅलंटिअर्सना साधारणपणे २८ दिवसांच्या आत दोन इंटामस्कयुलर इंजेक्शन दिले जातील. या परीक्षणात भाग घेणाऱ्या लोकांचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे ही मल्टीसेंटर थर्ड फेस ट्रायल भारतात एकूण 22 ठिकाणी होईल.
एकच लक्ष्य कोरोना लस
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग हैराण झालं आहे. सर्वच देशांनी कोरोना पुढे गुडघे टेकले आहेत. कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी संपूर्ण जगाचे लक्ष कोरोनावरील लशीकडं लागलं आहे. कोरोनावरील लस तयार करण्याच्या शर्यतीत भारतीय आहेतच. सर्वच भारतीयांच्या आशा आता कोव्हॅक्सीनवर आहेत.
देशभरात लस पोचविण्यासाठी विमानतळावर जय्यत तयारी
लसीचे कोट्यावधी डोस संपूर्ण देशात पोहोचविण्यासाठी कोल्ड चेन स्टोरेज व्यवस्था निर्माण केली जात आहे. विमानतळांवर कार्गो युनिट तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली आणि हैदराबाद विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या जीएसआर ग्रुप ने दोन्ही ठिकाणी कूलिंग चेंबर्स उभारले आहे. त्याशिवाय इतर काही वाहनतळावर आणि हवाई वाहतूक कंपनी लसीच्या वाहतुकीची तयारी सुरू केली आहे.
कोरोनावर मत देणाऱ्या या लस उपलब्धतेबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. तरी संपूर्ण भारतातच पोचविण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. भारतीय हवाई वाहतूक आणि विमानतळ व्यवस्थापनाने याबाबतचे नियोजन करण्यास सुरुवात देखील केली आहे.