बीड : पोलीसनामा ऑनलाइन – अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर सोडण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना नायब तहसीलदाराला लाचलुचपत प्रितिबंधक विभागाने रंगेहाथ पकडण्यात आले. नायब तहसील दारासह खासगी व्यक्तीला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई गेवराई तहसील परिसरात आज (बुधवार) दुपारी एकच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे गेवराई महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
नायब तहसीलदार प्रल्हाद शिंदे आणि खासगी इसम माजीद शेख असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत. अवैध वाळू वाहतूक करणारा एक टिप्पर सोडण्यासाठी तक्रारदारास 1 लाख रुपयाची लाच मागण्यात आली होती. गेवराई परिसरात लाचलुचपत प्रितिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई करत दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणी आरोपींवर गेवराई पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.