बीड : बहुजननामा ऑनलाइन – एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) पुण्यातील (Pune News) एका डॉक्टरने भरतेच कांड केल्याचे समोर आले आहे. डॉक्टरने बीडमध्ये (Beed Crime) राहणाऱ्या आपल्या वर्गमैत्रिणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट (Fake Instagram Account) तयार करुन तिच्या मैत्रिणीसोबत चॅटींग केली. मात्र त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. बीडमध्ये (Beed Crime) राहणाऱ्या तरुणीला हा प्रकार समजताच तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करुन सायबर पोलिसांनी (Cyber Police) हा गुन्हा उघडकीस आणून डॉक्टरचा पर्दाफाश केला आहे.
डॉ. गोपाळ दहिवाळ Dr. Gopal Dahiwal (रा. पुणे) असे या डॉक्टरचे नाव आहे. पीडित तरुणीने शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) तक्रार दिली. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड (Police Inspector Ravindra Gaikwad) यांनी इन्स्टाग्रामशी संपर्क साधून संबंधित अकाउंट बाबत माहिती मागवली. यावेळी डॉ. दहिवाळ याने पीडित तरुणीचा फोटो आणि नावाचा वापर करुन दीड महिन्यापूर्वी हे अकाउंट सुरु केल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी आरोपी डॉक्टरला सायबर सेलमध्ये (Cyber Cell) हजर राहण्यास सांगून त्याची कसून चौकशी केली. यावेळी त्याच्याकडील मोबाइल पोलिसांनी जप्त केला. (Beed Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आरोपी डॉ. दहिवाळ आणि पीडित तरुणी हे वर्गमित्र असून दोघेही बीएचएमएस चे (BHMS) शिक्षण घेताना एकाच वर्गात होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये ओळख झाली होती. याच ओळखीतून आरोपी तरुणीच्या प्रेमात पडला. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करु लागला होता. यातूनच त्याने हे कांड केल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावून सोडून दिले आहे. पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत.
Web Title :- Beed Crime | Pune doctor create fake account on instagram to chat with classmates female friend crime in beed