Beed Crime | महिला पोलिसाच्या नावाने बनावट Facebook अकाऊंट, BSF जवानाला अटक

बीड : बहुजननामा ऑनलाईन – Beed Crime | बीड जिल्हा पोलीस दलातील (Beed Police Force) एका महिला अंमलदाराच्या नावाने सोशल मीडियावर (Social Media) बनावट अकाउंट (Fake Account) तयार करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवालाना अटक (Arrest) करण्यात आली आहे. संदीप लहू राठोड (Sandeep Lahu Rathod) असे अटक करण्यात आलेल्या बीएसएफ जवानाचे नाव आहे. राठोड याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) कलम 406, 420, 354 (ड), 506 सह 66, 66 सी नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन शनिवारी (दि.16) पहाटे औरंगाबाद (Aurangabad) येथून अटक (Beed Crime) केली. त्याला न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.
पीडित महिला अंमलदार एका पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावतात. त्यांच्या नावाने संदीप लहू राठोड (वय – 26 रा. जातेगाव ता. गेवराई – Gevarai) याने फेसबुकवर बनावट अकाउंट तयार केले. त्याआधारे तो मित्रांच्या यादीतील लोकांसोबत महिला अंमलदार असल्याचे भासवून चॅटिंग (Chatting) करत होता. हा प्रकार लक्षात येताच महिला अंमलदारांनी तक्रार दिली. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात राठोड याच्यावर गुन्हा दाखल (Beed Crime) केला.
प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार (SP Sunil Langewar), उपअधीक्षक संतोष वाळके (Deputy Superintendent Santosh Walke), पोलीस निरीक्षक केतन राठोड (Police Inspector Ketan Rathore) यांनी उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर (PSI Praveen Patharkar) यांचे पथक रवाना केले. औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस ठाण्याच्या (City Chowk Police Station) हद्दीतील एका लॉजमधून पोलीस उपनिरीक्षक पाथकर, पोलीस नाईक विष्णू चव्हाण सिटीचौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय नंद (Police Inspector Sanjay Nand) यांनी संदीप राठोड याला बेड्या ठोकल्या.
दोन महिन्यापासून गैरहजर
दीड वर्षापूर्वी संदीप राठोड आणि पिडीत महिलेची गेवराईमध्ये ओळख झाली. त्यानंतर ते सोशल मीडियावर मित्र झाले.
याचा गैरफायदा घेत संदीप राठोड याने महिला अंमलदारास त्रास देण्यास सुरुवात केली.
2017 मध्ये बीएसएफमध्ये रुजू झाल्यानंतर तो पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) कार्यरत होता.
मात्र, दोन महिन्यांपूर्वी त्याची सुट्टी संपल्यानंतरही तो कर्तव्यावर हजर झाला नाही.
पोलिसांना देत होता गुंगारा
पीडित महिलेने तक्रार अर्ज केल्यानंतर राठोडला पकडण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील एक पथक 12 एप्रिल रोजी पुण्यात (Pune) आले होते.
मात्र, त्याने पोलिसांना गुंगारा दिला. त्यानंतर पीडितेशी चॅटिंग करुन त्याने पोलीस माझ्यापर्यंत पोहचू शकत नाहीत,
असे आव्हान दिले. त्यानंतर चौथ्या दिवशी त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
Web Title :- Beed Crime | fake facebook account in the name of female police bsf jawan arrested
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- Pune Crime | अनैतिक संबंधातून जन्म झाल्याच्या संशयावरुन बापानेच केला 3 वर्षाच्या ‘मुस्कान’ चा खून, आंबेगाव बुद्रुक परिसरातील घटना
- Rupali Patil | ‘कायदा हातात घेतल्यावर कारवाई होणार, राज ठाकरेंनी…”; रूपाली पाटील यांचा मनसेवर निशाणा !
- Supreme Court On Hawkers | ‘फेरीवाल्यांना रात्री रस्त्यावर साहित्य ठेवण्याचा हक्क नाही’ – सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा
Comments are closed.