बीड / गेवराई : बहुजननामा ऑनलाईन – Beed Crime | राक्षसभुवन रोडवरील सावळेश्वर जवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात मंडळ अधिकारी जागीच ठार झाले तर बीडच्या तहसीलदारांसह एक कर्मचारी जखमी झाला आहे. हा अपघात (Beed Accident) शनिवारी मध्यरात्री झाला असून तहसीलदारांना अधिक उपचारासाठी पुण्याला (Pune) हलवण्यात आले आहे. (Beed Crime)
नितीन जाधव (वय ३९) असे ठार झालेल्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे तर बीडचे तहसीलदार सुरेंद्र डोके व अन्य एक कर्मचारी जखमी झाले आहे. (Beed Crime)
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील वाळू पट्यात पाहणी करण्यासाठी बीडचे तहसीलदार सुरेंद्र डोके, मंडळ अधिकारी नितीन जाधव आणि अन्य एक कर्मचारी आले होते.
त्यानंतर ते मध्यरात्री गेवराईकडे चालले असताना राक्षसभुवन रोडवरील सावळेश्वर जवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजुला असलेल्या खड्यात पडली.
हा अपघात इतका भीषण होता की, नितीन जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर तहसीलदार डोके आणि एक कर्मचारी जखमी झाले.
दरम्यान, पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डोके यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना पुण्याला उपचारासाठी नेण्यात आले.
जाधव यांचा मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केला आहे.
Web Title :- Beed Crime | board officer died on the spot and tehsildar and other worker injured in car accident in gevrai
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Gluten Free Diet | ग्लूटेन-फ्री डाएट सुरू करताय का?, तर अगोदर जाणून घ्या याचे फायदे आणि नुकसान !
Gold Price | सोन्याची जोरदार वाटचाल, मे 2021 नंतर दिसून आली सर्वात मोठी साप्ताहिक तेजी