Beed Crime | पोलीस व्हॅनचे स्टेअरिंग ओढून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न, व्हॅन उलटून 4 पोलिसांसह 7 जण जखमी

Beed Crime | beed police van accident police and suspected accused injured total 4 police injurded

बीड / नेकनूर : बहुजननामा ऑनलाईन Beed Crime | खून प्रकरणात कोठडीत असलेल्या आरोपीने घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी नेत असताना धावत्या व्हॅनमध्ये चालकाला हिसका दिला. त्यानंतर पोलीस व्हॅन उलटून चार पोलीस, दोन पंच आणि आरोपी असे सातजण जखमी झाले. ही घटना (Beed Crime) आज (सोमवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास पाटोदा-मांजरसुंबा महामार्गावरील ससेवाडी फाट्याजवळ घडली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

आरोपी रोहिदास विठ्ठल निर्मळ (रा. मुळूकवाडी ता. बीड) याने शनिवारी (दि.26) सकाळी शेतीच्या वादातून चुलते बळीराम निर्मळ (वय-75) यांचा कोयत्याने सपासप वार करुन खून केला होता. त्याने चुलती केशरबाई निर्मळ यांच्यावरही हल्ला केला होता. यावेळी वाद सोडवण्यासाठी आलेल्या इतर दोघांना देखील मारहाण करण्यात आली होती. याबाबत रोहिदाससह त्याचे वडील विठ्ठल आणि आई कौसाबाई निर्मळ यांच्यावर नेकनूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी शनिवारी विठ्ठल आणि कौसाबाई यांना अटक केली होती. तर आरोपी रोहिदास याला रविवारी (दि.27) अटक केली होती. आरोपींना न्यायालयात हजर केले असता रोहिदास याच्या आई-वडिलांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती तर रोहिदास याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.

 

दरम्यान, आज आरोपी रोहिदास याला घेऊन नेकनूर पोलीस व्हॅनमधून मुळूकवाडी येथे घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत दोन सरकारी पंच होते. मधल्या सीटवर बसलेल्या आरोपीचे दोन्ही हात पोलिसांनी पकडून ठेवले होते. दरम्यान, ससेवाडी फाट्यावर त्याने आपले डोके चालक व सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत देशमुख यांच्या डोक्यावर आदळले. त्यामुळे त्यांच्या हाताला झटका बसला. यावेळी आरोपीने स्टेअरिंगला हिसका दिल्याने व्हॅन रस्त्याखाली उतरून उलटली. यामध्ये सात जण जखमी झाले.

 

या अपघातात सहायक पोलीस निरीक्षक शेख मुस्तफा, सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत देशमुख,
अंमलदार सचिन मुरुमकर, बाबासाहेब खाडे, पंच म्हणून गेलेले नेकनूर ग्रामपंचायतीचे कर्मचारी
सय्यद फारेज सय्यद रहेबाज व संदीप काळे हे जखमी झाले आहे.
शेख मुस्तफा यांच्या खांद्याला व डोक्याला दुखापत झाली असून आरोपी रोहिदास निर्मळ याच्या डाव्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे.
सर्व जखमींवर बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आरोपीला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. (Beed Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

Web Title :- Beed Crime | beed police van accident police and suspected accused injured total 4 police injurded

 

हे देखील वाचा :

Molestation Case | विनयभंगाच्या कलमाखाली आरोपी महिलेला दोषी ठरविण्याचा न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

Abdul Sattar On Thackeray Group | “एखाद्या महिलेनं मला चोर, गद्दार म्हंटलं तर कसं सहन करणार’? अब्दुल सत्तार यांचा प्रश्न

Pune Crime | बिबवेवाडी भागात दहशत माजविणाऱ्या अनिल चव्हाण व त्याच्या 7 साथीदारांवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 110 वी कारवाई