बीड : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयात बेड्स उपलब्ध होत नाही. ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. अशा रुग्णांना होमक्वारंटाईन करुन उपचार केले जात आहेत. अशातच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एक कोरोना संक्रमित रुग्णाने एक धक्कादायक प्रकार केल्याचे समोर आले आहे.
यावेळी चुलत भाऊ दीपक फुंदे सुभाषला म्हणाला, तू आमच्या मालकीचं शेत नांगरु नको, तुझ्यात शेताची नांगरणी कर, यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला. यानंतर संतापलेल्या कोरोना बाधित सुभाषने आपल्या तोंडाचा मास्क काढून चुलत भाऊ दीपकच्या अंगावर थुंकला. यावरुन दोन्ही परिवारात जोरदार मारामारी झाली. याप्रकरणी श्रीराम फुंदे यांनी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी बळीराम फुंदे, सुभाष फुंदे, कुसुम फुंदे, उषा फुंदे या चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास केज पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अमोल गायकवाड करत आहेत.