नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानची अर्थव्यवस्था भलेही डळमळत असेल तसेच तेथील लोकं अन्नासाठी तरसत असतील पण पाकिस्तान सरकार आणि संसद सुधारत नाहीत. आता पाकिस्तान संसद परिसरासाठी एक मोठी घोषणा केली जाणार असून ती ऐकताच धक्का बसेल.
पाकिस्तानच्या संसद भागात महिला खासदारांसाठी ब्युटी पार्लर उघडण्याचे आदेश दिले गेले आहेत. सीनेटच्या एका समितीने इस्लामाबादच्या वरिष्ठ नागरी एजन्सीला संसद परिसरात ब्युटी पार्लर उघडायला सांगितले आहे.
एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार समितीत सहभागी असलेल्या महिला सीनेटने हा मुद्दा मांडला होता. सीनेटची आवास समिती बैठक संसद भवन भागात झाली होती. त्याच बैठकीत महिला खासदारांसाठी ब्युटी पार्लर उघडण्याचा निर्णय झाला. इतकेच नाही तर समितीने राजधानी विकास प्राधिकरणाला या गोष्टीसाठी फटकारत सूचना असतानाही अजून महिला खासदारांसाठी पार्लमेंट लॉजमध्ये ब्युटी पार्लर का उघडले गेले नाही, असा प्रश्न केला आहे.
सीनेटर कुलसुम परवीन यांनी समितीला सांगितले की, समिती आयोजकांची स्पष्ट सूचना आहे की, सीडीए अधिकरी पार्लमेंट लॉजमध्ये ब्युटी पार्लरसाठी जागा द्या आणि सीनेटर समीना सईद यांच्यासही संपर्क करा, अशी माहिती मिळत आहे.
ज्या कमिटीने हा आदेश दिला आहे, त्या कमिटीचे चेअरमन सलीम मांडीवाला यांच्याकडून सीडीएच्या मुद्द्यावर दोन महिलांचे नाव दिले गेले होते. त्यांच्याकडून सल्ला घेऊन या मुद्द्यावर निर्देश दिले होते.
इस्लामाबादमधील संसद परिसरातील ब्युटी पार्लर उघडण्यापूर्वीही अनेक प्रतिष्ठान उघडण्यात आले असून संसदीय गृहनिर्माण परिसरात अलीकडेच दैनंदिन वापरासाठीचे एक दुकान उघडले गेले आहे.
येथे संसद संकुलात ब्युटी पार्लर सुरू करण्याचे आदेश दिले असून पाकिस्तानमध्ये महागाई शिगेला पोहोचली आहे. तसेच तेथे अर्थव्यवस्थेची स्थिती अत्यंत बिकट असून २००७-०८ मध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये महागाईचा दर १७ टक्क्यांवर पोहोचला होता.
अलीकडेच इम्रान खान यांनी सांगितले की, सर्वसामान्य लोकांना आणि वेतनधारांना त्रास होत आहे. या लोकांकडून वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या वाढत्या किंमतीं कशा रोखता येईल, याची खबरदारी घेतली जाईल.